मुख्यमंत्र्यांनी काढली भाजपची लायकी; भाजप संतप्त

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

मुख्यमंत्र्यांनी काढली भाजपची लायकी; भाजप संतप्त

मुंबई, दि. 25 - 27 फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून ओळखला जातो. त्या अनुषंगाने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मराठी प्रेमी प्रयत्न करीत आहेत. अशाच एका कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सामील झाले होते. या वेळी त्यांनी बोलताना मोदी सरकारची लायकी काढली आहे. भाजपने हिंदुत्वाचा वापर सत्तेसाठी केला असून अभिजात भाषेचा दर्जा द्यायची तुमची लायकी आहे का असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्र्यांनी संताप व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बऱ्याच दिवसांनी सार्वजनिक सोहळ्यात सहभागी झाले. यावेळी बोलताना, महाराष्ट्रात कुणालाही स्वबळावर सत्ता अशक्य असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी मोदी सरकारची लायकी काढली. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यायची तुमची लायकी आहे का? असा प्रश्न विचारून त्यांनी नवा वाद जन्माला घातलाय.

मविआमधील नेत्यांवर होणाऱ्या कारवायांवर भाष्य करताना केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांवर सवाल उपस्थित केला आहे. केंद्रीय यंत्रणांना इतर राज्यात काही दिसत नाही का? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्राची लायकी काढल्यावर भाजपनेही त्यांना लगेच प्रत्युत्तर दिले आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘हे मुख्यमंत्री की, कुठल्या टोळीचे प्रमुख आहेत असा सवाल अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच मुख्यमंत्री कायमच पक्षप्रमुखाच्या भूमिकेत असून मुख्यमंत्री म्हणून भाषेची मर्यादा का नाही, असा सवालही भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणाची दिवसेंदिवस पातळी घसरत चालली आहे. प्रत्येक पक्ष दुसऱ्या पक्षावर खालच्या स्तरावर जाऊन टीका करताना दिसत आहे. तर बऱ्याच वेळा गुंडगिरीचीही भाषा ऐकायला मिळत आहे. राज्य विरुद्ध केंद्र असा टोकाचा संघर्ष पाहायला मिळत आहे.