लोणावळा भूशी डॅम धबधब्यात पाच जण वाहून गेले

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

लोणावळा भूशी डॅम धबधब्यात पाच जण वाहून गेले

         लोणावळा , (प्रबोधन न्यूज )  - मान्सूनचे आगमन झाल्यानंतर सर्वत्र पावसाची मजा घेण्यासाठी पर्यटक घराबाहेर पडत आहेत. मात्र या पावसात धरणे आणि धबधब्यांचे आकर्षण मोठे आहे. या धबधब्यामुले देखील अपघात होऊ शकतात. ज्या जागेची आपल्या काहीच माहीती नाही अशा ठिकाणी जाण्याचे धाडस प्रसंगी जीवावर बेतू शकते. कारण अशीच घटना घडली आहे. लोण्यावळ्यातील प्रसिद्ध भूशी डॅमनजीक सहलीसाठी गेलेले अख्खे कुटुंबच धबधब्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेतील महिलेचा आणि दोन मुलींचा मृतदेह बचाव पथकाला सापडला आहे.

लोणावळा येथील भूशी डॅम यंदाच्या पावसाच्या मोसमात पहिल्यांदाच ओव्हर फ्लो झाल्याने येथे रविवार निमित्त पर्यंटकांची गर्दी वाढली आहे. यातील पायऱ्यांवर झोपून पर्यंटक धबधब्याच्या पाण्याचा आनंद घेत आहेत. परंतू येथील भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटर फॉल पाहण्यासाठी अन्सारी कुटुंब गेले होते. त्यांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाल्याची घटना घडली आहे. या कुटुंबाचा बचाव पथकाने घेतला असताना एका महिलेचा आणि तिच्या दोन मुलींचे मृतदेह अखेर सापडले आहेत. यातील तीन मुलांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरु आहे.

महिला आणि मुलींचे मृतदेह सापडले
भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरात धबधबा आहे. हा रेल्वेच्या मालकीचा भाग असल्याचे म्हटले जाते. येथूनच भूशी डॅमला पाणी येते. या धबधब्यात एकाच कुटुंबातील पाच सदस्य वाहून गेल्याचे म्हटले जात आहे. वानवडीतील सय्यदनगर परिसरात राहणारे अन्सारी फॅमिली फिरण्यासाठी येथे आले होते. भुशी धरण परिसरात त्यातील पाच जण वाहून गेल्याचे म्हटले जात आहे. यापैकी तीन जणांचे मृतदेह शोधण्यात रेस्क्यू टीमला यश आले आहे. यात एक महिला आणि दोन मुलींचा समावेश असल्याची माहीती पोलिसांनी दिली आहे. मृत्यू झालेल्या महिलेचे वय 36 तर दोन्ही मुलींचे वय हे 13 आणि 8 वर्षे असे आहे. अन्य 4 वर्षांची मुलगी आणि 9 वर्षांच्या मुलाचा शोध सुरू आहे. दुपारी एक च्या सुमारास ही घटना घडली होती.