भाजपच्या तेजस्विनी कदम पिंपरी विधानसभेसाठी इच्छुक, नागरिकांच्या भेटीगाठी सुरू 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

भाजपच्या तेजस्विनी कदम पिंपरी विधानसभेसाठी इच्छुक, नागरिकांच्या भेटीगाठी सुरू 

पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - आगामी विधानसभा तोंडावर आल्याने सर्वच इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव तेजस्विनी कदम या देखील गेल्या काही महिन्यांपासून तयारीला लागल्या आहेत. भाजपकडून त्यांना ताकद मिळाल्यास पिंपरीला एक उच्चशिक्षित आमदार मिळणार आहे. 

2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी तेजस्विनी कदम या तीव्र इच्छुक होत्या. मात्र, त्यावेळी हा मतदार संघ युतीतील मित्र पक्षाला गेल्याने त्यांना माघार घ्यावी लागली. मात्र, 2024 साठी त्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केल्याने भाजपकडून त्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. कदम या विरांगणा सोशल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा आहेत. फाऊंडेशनच्या माध्यमातून पिंपरी विधानसभा मतदार संघातच नव्हे तर पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून त्या सामाजिक कार्य करत आल्या आहेत. तळागाळातील घटकापर्यंत पोहोचण्याची त्यांची धडपड पाहून त्यांना 2014 मध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि पक्षाचे तत्कालीन प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर भारतीय जनता युवती मोर्चा शहर युवती अध्यक्ष पदाची धुरा सोपविली होती. पक्षाच्या माध्यमातून त्यांनी पिंपरी विधानसभेत नागरिकांचे प्रश्न, समस्या सोडविण्यावर भर दिला. त्यांच्या कामाची धडाडी पाहून भाजपाचे माजी शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या कार्यकाळात त्यांच्यावर भाजपा युवा मोर्चा शहर सरचिटणीस पदावर काम करण्याची संधी देण्यात आली. या पदाचा उपयोग त्यांनी समाजातील वंचित, दिनदुबळ्या, निराधार लोकांसाठी केला. महिलांचे संघटन मजबूत करुन पक्षाची ध्येय धोरणे बळकट करण्यावर त्यांनी अधिक भर दिला.  

त्यांच्या कार्याचा प्रभाव पाहून पक्षाच्या वरीष्ठ नेतृत्वाने त्यांच्यावर भाजपा युवती मोर्चाच्या प्रदेश सचिव पदाची धुरा सोपविली. या पदावर काम करताना त्यांनी राज्यभराचा दौरा केला. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी खासदार श्रीरंग बारणे यांना पिंपरी विधानसभेतून मताधिक्य मिळवून देण्यासाठी अहोरात्र कार्य केले. त्यामुळे बारणे यांच्या विजयात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी पिंपरी मतदार संघावर दावा ठोकला आहे. निवडणुकीचे तिकीट मिळवण्यासाठी त्यांनी पक्षाच्या वरीष्ठ पातळीवर फिल्डींग लावली आहे. येणा-या काळात तेजस्विनी कदम या पिंपरी विधानसभेसाठी भाजपाचा प्रमुख चेहरा म्हणून समोर येणार असल्याचे बोलले जात आहे.