खालापूर दुर्घटनाग्रस्तांना मोफत शिवभोजन थाळी, 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू, पीठ, साखर देणार; छगन भुजबळ यांची घोषणा

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

खालापूर दुर्घटनाग्रस्तांना मोफत शिवभोजन थाळी, 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू, पीठ, साखर देणार; छगन भुजबळ यांची घोषणा

मुंबई, (प्रबोधन न्यूज )  -  खालापूर येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 34 जणांना दरडीतून सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. अजूनही ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. डोंगराचा कडाच कोसळल्याने खालापूरमधील इर्शाळवाडीतील घरे जमीनदोस्त झाले आहेत. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. सर्व काही दरड आणि पावसात वाहून गेलं आहे. किडूकडूकमिडूकही जवळ उरलं नसल्याने येथील गावकरी हतबल आणि हताश झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोठी घोषणा केली आहे. जोपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येत नाही, तोपर्यंत दुर्घटनाग्रस्तांना शिधा पुरवला जाईल, अशी घोषणा छगन भुजबळ यांनी केली आहे.

छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधताना ही घोषणा केली. छगन भुजबळ यांनी मंत्रालयातील दालनात अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली आणि तातडीने मदत पुरविण्याचे आदेश दिले. दुर्घटनास्थळी मोफत शिवभोजन थाळीचे पॅकेट वाटप करण्यात येणार आहे. आजूबाजूच्या शिवभोजन केंद्रावरून हे पॅकेट देण्यात येणार आहे. शिवाय 5 लिटर रॉकेल, 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू किंवा त्याचे पीठ, तूरडाळ, तेल, साखर देखील मोफत देण्यात येणार असल्याचे भुजबळ यांनी जाहीर केले आहे. जोपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत हा पुरवठा सुरूच राहणार असल्याचे सांगतानाच छगन भुजबळ यांनी रायगड जिल्हाधिकारी यांना तातडीने याबाबतचे आदेश दिले आहेत.