डेक्कन क्वीन आता अधिक आकर्षक रूपात धावणार
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पुणे, दि. 22 - मार्च महिन्यापासून पुणेकरांची आवडती डेक्क्न क्वीन आता नव्या आकर्षक रूपात धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. येत्या मार्च महिन्यापासून नव्या 'एलएचबी रेक'सह डेक्कव क्वीन धावणार आहे. खास तयार करण्यात आलेल्या 'रेक'चे पाच डबे खडकी रेल्वेस्थानकावर दाखल झाले आहेत. येत्या काही दिवसांत उर्वरित डबे आल्यानंतर, डेक्कन क्वीन नव्या रूपात धावणार आहे.
या रेल्वेसाठी हिरव्या आणि लांल रंगाने सजलेले डबे प्रवासासाठी सज्ज झाले आहेत. त्याचप्रमाणे रेल्वेतील प्रवाशांची आवडती जागा असणारी 'डायनिंग कार'ही नव्या रुपात येणार आहे. या नव्या रेकमध्ये एकूण २० डबे असून, त्यातील दहा डबे आले आहेत. त्यातील पाच डबे खडकीच्या रेल्वेस्थानकावर दाखल झाले आहेत. नव्या रेकचे सध्या दहा डबे उपलब्ध झाले आहेत. आणखी दहा डबे आल्यावर, संपूर्ण २० डब्यांची नवी रेक पूर्ण होईल. त्यानंतर मार्च महिन्यापासून नव्या रेकसह डेक्कन क्वीन धावण्याची शक्यता आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच 'डेक्कन क्वीन'ला विस्टा डोमची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
डायनिंग कार प्रशस्त होणार
डायनिंग कार असणारी डेक्कन क्वीन ही देशातील एकमेव रेल्वे आहे. ही डायनिंग कार उपलब्ध होत नसल्याने, नव्या रेकला येण्यासाठी उशिर झाला. आताच्या डायनिंग कारमध्ये ३२ जणांची आसन क्षमता आहे. नव्या डायनिंग कारमध्ये आसनक्षमता ४० पर्यंत वाढविण्यात आली आहे.