फडणवीसांच्या सागर बंगल्यावर काँग्रेसचा हल्लाबोल

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

फडणवीसांच्या सागर बंगल्यावर काँग्रेसचा हल्लाबोल

काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड सुरू; वातावरण चिघळले


वारकरी संप्रदायही मोदींच्या निषेधार्ह सागर बंगल्यावर जमा

मुंबई, दि. 14 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभेत बोलताना महाराष्ट्राविषयी बदनामीकारक वक्तव्ये केली. त्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाकडून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मोर्चा काढण्यात येणार आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते फडणवीस यांच्या बंगल्याबाहेर जमणार आहेत. या पार्श्वभूमीवर आता मुंबईतील वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.

पोलिसांकडून देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याबाहेर मोठा फौजफाटा तैनात केला आहे. पोलिसांनी सागर बंगल्याकडे जाणारे दोन्ही रस्ते बंद केले आहेत. तर दुसरीकडे भाजपचे कार्यकर्तेही फडणवीस यांच्या बंगल्यावर दाखल व्हायला सुरुवात झाली आहे.

मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष मंगलप्रभात लोढा देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर आले आहेत. पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना याठिकाणी येऊ देण्यास मज्जाव करावा, अशी मागणी लोढा यांनी  केली. तर भाजपचे कार्यकर्ते फडणवीस यांच्या बंगल्याच्या परिसरात शांतपणे बसून राहतील. ते कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेणार नाहीत, असे मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले.   काँग्रेसचे कार्यकर्ते आल्यास येथे मोठा राडा होण्याची शक्यता आहे. 

देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ प्रसाद लाड आणि आशिष शेलार हे दोन नेते मैदानात उतरले आहेत. हे दोन्ही नेते आपापले कार्यकर्ते घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाणार आहेत. त्यासाठी प्रसाद लाड यांच्या सायनमधील कार्यालयाबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जमायाला सुरुवात केली आहे. याठिकाणाहून भाजपचे २०० ते २५० कार्यकर्ते दुचाकीवरुन सागर बंगल्यावर जातील, असे समजते.

दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांना सागर बंगल्याच्या परिसरात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.