दोन वेगवेगळ्या धरणात बुडून 9 जणांचा मृत्यू
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मृतांमध्ये 5 महिला आणि 4 तरुणांचा समावेश आहे.
पुणे, दि. 20 मे - पुण्यात गुरुवारी सायंकाळी दोन वेगवेगळ्या धरणात बुडून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. पहिला अपघात भोर तालुक्यातील भाटघर येथे तर दुसरा खेड तालुक्यातील चासकमान येथे झाला. भाटघरमध्ये पाच महिलांना जीव गमवावा लागला, तर चासकमान धरणात पिकनिकसाठी गेलेल्या चार तरुणांचा बुडून मृत्यू झाला. दोन्ही अपघातातील सहा मृतदेह बाहेर काढण्यात आले असून इतरांचा शोध सुरू आहे.
भाटघर धरणावर सायंकाळी 5 वाजता झालेल्या अपघातात खुशबू राजपूत (वय 19, रा. हडपसर), मनीषा राजपूत (वय 20 रा. हडपसर), चांदनी राजपूत (वय 21 रा. हडपसर), पूनम राजपूत (वय 22 रा. हडपसर) आणि मोनिका चव्हाण यांचा मृत्यू झाला. या पाच महिला धरणाजवळ फिरायला आल्या होत्या आणि आंघोळीसाठी पाण्यात गेल्या होत्या. सर्वजण पुण्याचे रहिवासी आहेत. पाण्यात बुडालेल्या पाचपैकी चार महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
महिला धरणाच्या काठावर उभ्या राहून सेल्फी घेत असताना एका महिलेचा पाय घसरला आणि तिला वाचवण्याच्या प्रयत्नात एक एक करून आणखी चार महिलांनी पाण्यात उड्या घेतल्या आणि खाली पडल्याचे तपासात समोर आले आहे. पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या पाच महिलांपैकी चार महिला एकाच कुटुंबातील होत्या. राजगड पोलीस स्टेशन हद्दीतील पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक कराल तेवढं कमी आहे. सह्याद्री रेस्क्यू टीम भोईराज जल आपत्ती संघ यांनी आज चांगले काम करून वेळेवर बॉडी शोधून काढल्या.
दुसरी घटना चासकमान येथील आहे. कृष्णमूर्ती फाऊंडेशन, सह्याद्री शाळेचे चार विद्यार्थी चासकमान धरणावर सहलीसाठी गेले होते. धरणाच्या गेटमधून बाहेर पडणाऱ्या पाण्यात आंघोळ करणारा सहकारी बुडू लागला. त्याला वाचवताना इतर तिघेही बुडाले. यातील दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.