वेडाच्या भरात डीपीत घातले दोन्ही हात : माजी सह प्राध्यापकाचा तडफडून झाला मृत्यू

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

वेडाच्या भरात डीपीत घातले दोन्ही हात : माजी सह प्राध्यापकाचा तडफडून झाला मृत्यू

पुणे, (प्रबोधन न्यूज) - रस्त्याच्या कडेला असलेल्या महावितरणच्या डीपीत दोन्ही हात घातल्याने एका व्यक्तीचा  तडफडून मृत्यू झाला. ही घटना विधी महाविद्यालयाजवळील जर्मन बेकरीसमोर गुरुवारी दुपारी घडली. मृत व्यक्ती त्रिवेंद्रम येथील एका महाविद्यालयातील माजी सहायक प्राध्यापक असून वेडाच्या भरात हा प्रकार घडला असल्याचे समजते. 

किरण राजकुमार (रा.त्रिवेंद्रम, केरळ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव यांनी दिलेल्या माहितीनूसार किरण राजकुमार हे दुपारी तीनच्या सुमारास जर्मन बेकरीसमोरी पदपथावरुन एकटेच बडबड करत चालले होते. अचानक त्यांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या महावितरणच्या डीपीचे दरवाजे उघडले. यानंतर दोन्ही हात डीपीमध्ये घातले. यामुळे वीजेचा तीव्र शॉक बसून ते रस्त्यावर फेकले गेले. काही वेळातच त्यांचा तडफडून मृत्यू झाला. ही घटना रस्त्यावरुन जाणाऱ्या दोन- तीन नागरिकांनी बघितली होती. त्यांनी तातडीने डेक्कन पोलिसांना फोन करुन ही माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांना ससून रुग्णालयात नेले. तेथे तपासणीअंती किरण यांना मृत घोषीत करण्यात आले. याबाबत अधिक तपास डेक्कन पोलीस करीत आहेत.