विनाकारण रेल्वेतील चेन ओढल्यास जावे लागेल तुरुंगात ! जाणून घ्या नियम 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

विनाकारण रेल्वेतील चेन ओढल्यास जावे लागेल तुरुंगात ! जाणून घ्या नियम 
नवी दिल्ली - 

भारतीय रेल्वेचे असे अनेक नियम आहेत, ज्यांच्याबद्दल लोकांना माहिती नाही किंवा त्यांच्याबद्दल माहिती असूनही ते त्यांचा गैरवापर करतात. यात चेन पुलिंगचाही समावेश आहे. आपत्कालीन स्थितीत चालणारी ट्रेन थांबवण्यासाठी प्रत्येक बोगीमध्ये एक साखळी दिली जाते, जी ओढल्यानंतर ट्रेन लगेच थांबते. मात्र असे बरेच लोक कोणत्याही आणीबाणीशिवाय उगाचच चेन पुलिंग करतात. असे करणे कायद्याने गुन्हा आहे आणि शिक्षा आणि दंडाची तरतूद असल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. म्हणजेच, जर लोकांनी कोणत्याही आणीबाणी शिवाय साखळी ओढून ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न केला तर रेल्वे पोलीस त्यांना अटक करू शकतात. कोणत्या परिस्थितीत तुम्ही ट्रेनची चेन ओढू शकता तसेच यासंदर्भातील रेल्वेचे नियम काय आहेत, जाणून घेणे गरजेचे आहे. 

० चेन ओढल्यानंतर ट्रेन कशी थांबते? 
सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की साखळी ओढल्यानंतर ट्रेन कशी थांबते? वास्तविक, ट्रेनची साखळी ट्रेनच्या मुख्य ब्रेक पाईपशी जोडलेली असते. या पाईप्समध्ये हवेचा दाब राखला जातो. पण साखळी ओढताच ही हवा बाहेर येते. हवेचा दाब कमी झाल्यामुळे, ट्रेनचा वेग कमी होतो, त्यानंतर लोको पायलट तीन वेळा हॉर्न वाजवून ट्रेन थांबवतो. प्रश्न असाही उद्भवतो की रेल्वे पोलिसांना हे कसे कळते की कोणत्या बोगीमध्ये चेन पुलिंग करण्यात आले आहे? वास्तविक, रेल्वेच्या डब्यांमध्ये आपत्कालीन फ्लॅशर्स बसवले जातात, जे सांगतात की ट्रेनची साखळी कुठे ओढली गेली आहे. जर फ्लॅशर्स बसवले नाहीत, तर ट्रेनच्या गार्डला जाऊन पाहावे लागेल की ट्रेनच्या कोणत्या डब्यात व्हॉल्व काढले गेले आहे. ज्या डब्यातून एअर पाईपचे कव्हर बाहेर येते, त्याच डब्याला चेन पुलिंगचे ठिकाण मानले जाते. अशा परिस्थितीत रेल्वे पोलीस विनाकारण चेन ओढणाऱ्यांना सहज पकडतात.

० विनाकारण चेन ओढल्यास शिक्षा काय ?
चेन पुलिंग सुविधेचा गैरवापर हा रेल्वेच्या नियमांतर्गत कायदेशीर गुन्हा आहे. रेल्वे कायद्याच्या कलम 141 नुसार, जर एखादा प्रवासी योग्य आणि पुरेशा कारणाशिवाय अलार्म चेन वापरतो, तर त्याला 1000 रुपये दंड किंवा एक वर्षासाठी तुरुंगवास होऊ शकतो.

० कोणत्या परिस्थितीत ट्रेनमध्ये चेन पुलिंग वैध आहे ?
- जर एखादा सहप्रवासी, ज्याचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे किंवा लहान मूल चुकले आणि ट्रेन सुरू झाली तर. 
- ट्रेनला आग लागली तर. 
- वृद्ध किंवा अपंग व्यक्तीला ट्रेनमध्ये चढण्यासाठी वेळ लागत असेल आणि तितक्यात ट्रेन सुरु झाली तर. 
- अचानक बोगीतील कोणी आजारी पडले तर. (स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका)
- ट्रेनमध्ये चोरी किंवा दरोडा झाल्याची घटना घडल्यास.