अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकास अटक
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी , (प्रबोधन न्यूज ) - अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी भोसरी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना डिसेंबर 2022 आणि 3 जून 2023 रोजी धावडेवस्ती, भोसरी येथे घडली.
सुभाष शिंदे (वय 44, रा. धावडेवस्ती, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत मुलीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या आई आणि वडिलांचे आपसात जमत नसल्याने फिर्यादी आणि त्यांची आई या दोघी आरोपीच्या घरी राहत होत्या. डिसेंबर 2022 मध्ये आरोपीने रात्रीच्या वेळी फिर्यादी आणि तिची आई घरात झोपलेल्या असताना फिर्यादिसोबत गैरवर्तन करत विनयभंग केला. त्यानंतर 3 जून रोजी फिर्यादी मुलगी, त्यांची आत्या आणि मावशी सोबत आईला समजावून घरी घेऊन जाण्यासाठी आल्या असता आरोपीने त्यांना शिवीगाळ करून धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.