स्पर्श हॉस्पिटलकडून माणुसकीला काळिमा फासणारा निर्लज्जपणा - नगरसेवक संदीप वाघेरे 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

स्पर्श हॉस्पिटलकडून माणुसकीला काळिमा फासणारा निर्लज्जपणा - नगरसेवक संदीप वाघेरे 

पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - सध्या पुणे तसेच पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाने हाहाकार माजविला असून रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळणे दुरापास्त झाले असून रुग्णांची बेड मिळवण्यासाठी वणवण सुरु असल्याचे चित्र आहे. या पार्शवभूमीवर पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या वतीने ऑटो क्लस्टर येथे चालविण्यात येत असलेल्या कोविड रुग्णालयातील माणुसकीला काळिमा फासणारा, अत्यंत दुर्देवी तितकाच धक्कादायक निर्लज्जपणाचा प्रकार सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. रिकामे बेड असतानाही जागा शिल्लक नसल्याचे या हॉस्पिटलमध्ये बेधडक सांगण्यात येत आहे. भाजपाचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी येथील रिकाम्या बेड्सचे चित्रीकरणचकरून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. रुग्णांच्या जीवाची क्रूर थट्टा करणाऱ्या हे हॉस्पिटल चालविणाऱ्या निर्लज्ज ठेकेदारावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वाघेरे यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रकोप वाढत चालला असून रोजच अडीच ते तीन हजार कोरोनाच्या रुग्णांची नव्याने भर पडत आहे. महापालिकेच्या वतीने रुग्णांना सोयी सुविधा दिल्या जात आहेत. कोरोना रुग्णांवर उपचार व्हावेत या हेतूने महापालिकेने ऑटो क्लस्टर येथे दीडशे O- 2 (ओ-२) आणि 50 आयसीयू बेडचे रुग्णालय उभारले आहे. हे रुग्णालय सध्या स्पर्श हॉस्पीटल या ठेकेदाराकडून चालविले जात आहे. त्यासाठी या ठेकेदाराला दरमहा कोट्यवधी रुपये दिले जात आहेत. मात्र भ्रष्टाचार करून महापालिकेला लुटण्याची सवयी लागलेल्या या ठेकेदाराचा उद्दामपणा आता पुन्हा नव्याने उघडकीस आला आहे.

भाजपाचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आज या रुग्णालयाला अचानक भेट दिली. त्यावेळी एकही बेड शिल्लक नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. मात्र त्यांनी रुग्णालयात जाण्याचा आग्रह धरून आत प्रवेश केला असता एक धक्कादायक बाब उघडकीस आली. वाघेरे यांनी या रुग्णालयातील आयसीयू आणि ओ 2 बेड रिकामे असल्याचे व्हिडीओ चित्रीकरण करून स्पर्श हॉस्पिटलचा माणुसकीला काळिमा फासणारा उद्योग उजेडात आणला.  त्यानंतर भंबेरी उडालेल्या ठेकेदार स्पर्श हॉस्पीटलच्या काही डॉक्टरांनी चुकीची बाजू लपविण्याचा प्रयत्न केला.  मात्र वाघेरे यांनी कोरोनासारख्या काळात रुग्णांना बेड मिळत नसताना पालिकेकडून कोट्यवधी रुपये घेऊनही बेड दिले जात नसल्याबद्दल जाब विचारला.  

भ्रष्टाचार करून पालिकेची लूट करणार्‍या स्पर्श हॉस्पीटलचा ठेका तात्काळ रद्द करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी वाघेरे यांनी केली आहे. या ठेकेदाराचे नातेवाईक महापालिकेत कार्यरत असल्याने वैद्यकीय विभागाकडूनही कोणतीच कारवाई केली जात नसल्याचे बोलले जात आहे. तर काही अधिकारी चिरीमिरी घेऊन या ठेकेदाराच्या चुका झाकण्यातच शहाणपणा मानत असल्याचे बोलले जात आहे. या संपूर्ण प्रकाराबाबत महापालिका आयुक्त काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.