दोन वर्षांपासून प्रलंबित शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर होणार

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

दोन वर्षांपासून प्रलंबित शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर होणार

क्रीडा मंत्री सुनील केदार यांचे आश्‍वासन 

पिंपरी - कोवीडमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने 2019-20 या वर्षातील शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार रद्द करण्यात आलेले नाही. शासन निर्णय निघाल्यानंतर 2019-20 आणि 2020-21 या वर्षाच्या पुरस्काराची प्रक्रिया करण्यात येणार आहे, असे राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार यांनी स्पष्ट केले आहे.

राज्य विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पुरवणी मागण्यांवर आमदार लक्ष्मण जगताप यांनी कपात सूचना मांडली होती. क्रीडा क्षेत्रातील मानबिंदू असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली होती. त्याला लेखी उत्तर देताना राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी ही भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटले आहे की, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वर्षनिहाय देण्यात येतात. 2018-19 या वर्षापर्यंत शासनाकडून हे पुरस्कार देण्यात आलेले आहे. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराच्या नियमावलीत सुधारणा करण्याचे प्रस्तावित आहे. त्याबाबत क्रीडा संचालनालयाद्वारे 11 फेब्रुवारी 2021 रोजी राज्य शासनाला प्रस्ताव पाठविला आहे. कोवीडच्या प्रादुर्भावामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीने 2019-20 या वर्षातील पुरस्कार रद्द केलेले नाही. या पुरस्काराला अनुसरून सुधारित शासन निर्णय जारी झाल्यानंतर 2019-20 आणि 2020-21 या दोन वर्षाच्या पुरस्कारासाठी विहित प्रक्रिया सुरू करण्यात येईल.