हनुमानाच्या जन्मस्थळावरून वाद चिघळला
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
नाशिक, दि. 30 मे - कर्नाटकातील किष्किंदाचे दंडास्वामी गोविंदानंद सरस्वतीजी महाराज यांनी हनुमानाचे जन्मस्थळ अंजनेरी नसून, किष्किंदा असल्याचा दावा केल्यानंतर आता अंजनेरी ग्रामस्थांनीही त्याविरोधात पवित्रा घेतला आहे. रविवारी त्र्यंबकेश्वर येथील साधुमहंतासोबत बैठक घेत थेट न्यायालयात जाण्याचा निर्णय या ग्रामस्थांनी घेतला आहे. न्यायालयात हनुमान जन्माचे पुरावे सादर करणार असल्याचेही या गावकर्यांनी सांगितले.
कर्नाटकातील किष्किंदाचे दंडास्वामी गोविंदानंद सरस्वतीजी महाराज यांनी वाल्मिकी रामायणानुसार हनुमानाचा जन्म अंजनेरीत नव्हे तर किष्किंदात झाल्याचा दावा करुन नाशिकच्या धर्मपंडितांना धर्मसभेचे आव्हान दिले आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी अंजनेरीतील अंजनी माता मंदिरात गावकरी आणि साधूसंतांची बैठक पार पडली. ब्रह्मपुराण, स्कंद पुराणात महत्वाचा उल्लेख, विष्णू पुराण, एकनाथ महाराजांचे भावार्थ रामायण, नवनाथ भक्तीसार, त्र्यंबक महात्म्य यातही अंजनेरी हेच जन्मस्थळ म्हणून उल्लेख असल्याची यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच, गोविंदानंद महाराज यांनी अंजनेरी किल्ल्यावर यावे आम्ही त्यांना सिद्ध करून दाखवू, असे गावकर्यांनी गोविंदानंद महाराजांना आव्हान दिले आहे.
गोंविदानंद महाराज यांनी केलेला दावा तथ्यहीन आहे. ब्रह्मपुराण, स्कंदपुराण, एकनाथ महाराजांचे भावार्थ रामायण, नवनाथ भक्तीसाद, त्र्यंबक महात्म्य यात अंजनेरी हेच हनुमानाचे जन्मस्थान असल्याचे साधुमहंतांनी स्पष्ट केले. उपस्थितांनी गोंविदानंद महाराज यांचा निषेधदेखील केला.
यावेळी श्रीमहंत ठाणापती ब्रह्मगिरीजी महाराज 1008 महंत श्री सोमेश्वरानंद महाराज, पिनाकेश्वरगिरी महाराज, माजी सरपंच कमलू कडाळे, माजी उपसरपंच गणेश चव्हाण यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.