न्यायालयाच्या आवारात माजी सैनिकाचा पत्नी, सासूवर गोळीबार; पत्नीचा मृत्यू

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

न्यायालयाच्या आवारात माजी सैनिकाचा पत्नी, सासूवर गोळीबार; पत्नीचा मृत्यू

शिरूर, (प्रबोधन न्यूज) - कौटुंबिक वादातून माजी सैनिकाने पत्नी आणि सासूवर गोळीबार केल्याची घटना मंगळवारी सकाळी शिरुरमधील न्यायालयाच्या आवारात घडली. गोळीबारात सैनिकाच्या पत्नीचा मृत्यू झाला असून या प्रकरणी सैनिकासह त्याच्या भावाला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

मंजुळा दीपक ढवळे उर्फ मंजुळा रंगनाथ झांबरे (रा. वाडेगव्हाण, ता. पारनेर, जि. अहमदनगर) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. मयत महीलेची आई तुळसाबाई रंगनाथ झांबरे रा. वाडेगव्हाण या गंभीर जखमी आहे. या प्रकरणी पती दीपक पांडुरंग ढवळे आणि त्याचा भाऊ संदीप (दोघे रा. अंबरनाथ, जि. ठाणे) यांना अटक करण्यात आली. दीपक ढवळे माजी सैनिक आहे. दीपक आणि त्याची पत्नी मंजुळा यांच्यात कौटुंबिक वाद होता. त्याच्या पत्नीने शिरुर न्यायालयात पोटगी मिळण्यासाठी अर्ज केला होता. मंगळवारी (७ जून) सकाळी मंजुळा आणि तिची आई शिरुर न्यायालयात गेल्या होत्या. आरोपी दीपक आणि त्याचा भाऊ संदीप अंबरनाथहून रिक्षातून शिरुर न्यायालयात गेले होते. तेथे त्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला.

आरोपींना तात्काळ पाठलाग करून रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे, पोलिस ऊपनिरीक्षक देविदास कंरडे, शुभांगी कुटे, पो. अंमलदार ब्रम्हा पवार, संतोष औटी, शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक अभिजीत पवार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नजिम पठाण, पोलिस अंमलदार रांजेंद्र गोपाळे, प्रविण पिठले, संतोष सांळुंके यांनी दोनही आरोपींना ताब्यात घेतले आहे.