एखाद्या चित्रपटाप्रमाणेच आहे धनुष-ऐश्वर्याची लव्हस्टोरी, जी आता संपुष्टात आली !
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
दाक्षिणात्य अभिनेता धनुषने सोमवारी आपला १८ वर्षांचा संसार मोडत, पत्नी ऐश्वर्या रजनीकांतपासून वेगळे होण्याची घोषणा केली. प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या आणि धनुष यांचे २००४ मध्ये लग्न झाले आणि त्यांना यात्रा राजा आणि लिंगा राजा ही दोन मुले आहेत.
धनुष आणि ऐश्वर्या यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपण विभक्त झाल्याची घोषणा देखील केली आहे. २००२ मध्ये ‘कडहाल कोंडेन’च्या स्क्रीनिंगच्या वेळी ऐश्वर्या आणि धनुष यांची पहिली भेट झाली. चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी ऐश्वर्या वडील रजनीकांत यांच्यासोबत आली होती. त्यावेळी धनुषचं परफॉर्मन्स पाहून ती त्याच क्षणी त्याच्या प्रेमात पडली होती. विशेष म्हणजे स्क्रिनिंगच्या दुसऱ्याच दिवशी ऐश्वर्याने धनुषच्या घरी पुष्पगुच्छ पाठवत त्याला संपर्कात रहा असं सांगितलं.
ऐश्वर्याने मैत्रीचा हात पुढे केल्यानंतर या दोघांची मैत्री वाढत गेली आणि त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. ऐश्वर्या धनुषपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे. २००४ रोजी धनुष आणि ऐश्वर्याने घरातल्यांच्या संमतीने लग्न केलं. या दोघांचा लग्न सोहळा दाक्षिणात्य कलाविश्वातील गाजलेल्या लग्नसोहळ्यांपैकी एक आहे.