सामंथाचे लवकरच बॉलिवूड पदार्पण ? 'या' चित्रपटात तापसी पन्नूसोबत दिसणार

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

सामंथाचे लवकरच बॉलिवूड पदार्पण ? 'या' चित्रपटात तापसी पन्नूसोबत दिसणार
मुंबई -  

अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू तिचा पहिला परदेशी चित्रपट ‘ऍरेंजमेंटऑफ लव्ह’ करून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, समंथा आणि बॉलिवूड स्टार तापसी पन्नू लवकरच एका महिला-केंद्रित चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. चित्रपट सशक्त विषयावर आधारित असू शकतो. मात्र, सध्या या प्रकल्पाबाबत दोन्ही अभिनेत्रींसोबत चर्चा सुरू आहे. अद्याप कोणतेही करार झाले नाहीत. या प्रकल्पाबाबत निर्माते सध्या आगाऊ बोलणी करत असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटाबाबत अधिक माहिती लवकरच समोर येईल.

समंथा प्रभूने ओटीटीवर मनोज बाजपेयी स्टारर, 'द फॅमिली मॅन 2' द्वारे अतिशय प्रभावी पद्धतीने पदार्पण केले आहे. आत्मघाती मोहिमेवर श्रीलंकन तमिळ मुक्ती सेनानी राझी या भूमिकेत तिने आपल्या ताकदीच्या अभिनयाने  प्रेक्षकांना मोहित केले. आता ही अभिनेत्री तापसीबरोबर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

सामंथा अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा: द राइज'चा एक भाग आहे. तसेच ती विघ्नेश शिवनच्या रोमँटिक कॉमेडी चित्रपटामध्ये देखील आहे. या प्रकल्पाचे लेखन आणि निर्मिती स्वत: विघ्नेश शिवन यांनी केली आहे. या चित्रपटात विजय सेतुपती आणि नयनतारा मुख्य भूमिकेत आहेत आणि फेब्रुवारी 2022 पर्यंत रिलीज होण्याची अपेक्षा आहे.

दुसरीकडे, तापसी पन्नूबद्दल बोलायचे झाले तर ती सृजित मुखर्जी यांच्या शाबाश मिठू या स्पोर्ट्स ड्रामामध्ये दिसणार आहे. अजित अंधारे दिग्दर्शित हा चित्रपट ४ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.