विकी-कतरिनाच्या लग्नातील शाही भोजनासाठी इटलीचे खास शेफ !
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
० मेनूमध्ये राजस्थानच्या पारंपारिक पदार्थांपासून ते परदेशी पदार्थांचा समावेश
कतरिना-विक्कीच्या लग्नात परदेशी पाहुणेही येणार असल्याने त्यांच्या आवडीची विशेष काळजी घेण्यात आली आहे. लग्नात देशीपासून ते विदेशी पदार्थांपर्यंत सर्वच पदार्थांचा समावेश आहे. लग्नाच्या मेन्यूमध्ये चाट, कबाब यांसारख्या पदार्थांचा समावेश आहे, तर राजस्थानची खास पारंपारिक डिश म्हणजे दाल-बाटी चुरमा ही पाहुण्यांना दिली जाईल.
० 'हा' आहे लग्नाचा खास मेनू
लग्नाच्या मेन्यूमध्ये पाहुण्यांसाठी दही भल्ला, कचोरी, फ्युजन चाट, पाणीपुरी सोबत पानाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर त्याच वेळी, उत्तर भारतीय खाद्यपदार्थांमध्ये कबाब, मासे आणि तिथल्या खास थाळचा समावेश होतो. मेनूमध्ये खास राजस्थानी डिश दाल-बाटी चुरमा आणि इतर अनेक स्वादिष्ट राजस्थानी पदार्थ आहेत. यासोबतच देशातील सर्व प्रसिद्ध मिठाईंनाही मेनूमध्ये स्थान देण्यात आले आहे.
० केक बनवण्यासाठी इटलीहून खास शेफ
विकी कतरिनाच्या लग्नापासून ते सजावटीपर्यंत सर्व काही शाही पद्धतीने केले जात आहे. लग्नात बनवल्या जाणार्या पदार्थांपासून ते केकपर्यंत विशेष तयारी करण्यात आली आहे. लग्नाचा केक खूप खास असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कतरिना-विक्कीच्या लग्नासाठी केक बनवण्यासाठी इटलीहून खास शेफला बोलावण्यात आले आहे. पाच मजली केक बनवण्याची तयारी सुरू आहे.
० रिसॉर्टचे एका दिवसाचे भाडे 'इतके'?
जिथे 7 डिसेंबरला कतरिना आणि विकीच्या लग्नात एक संगीत फंक्शन होते, 8 डिसेंबरला म्हणजेच आज मेहंदी आहे आणि 9 डिसेंबरला दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. माधोपूरच्या चौथ बरवरा येथील सिक्स सेन्सेस रिसॉर्टमध्ये दोघांचे लग्न होणार आहे. या रिसॉर्टच्या एका दिवसाचा खर्च सुमारे सहा ते सात लाख असल्याचे सांगण्यात येत आहे.