सोमाटणा टोलनाका बंद करण्यासाठी सर्वपक्षीय आंदोलनाची तयारी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

सोमाटणा टोलनाका बंद करण्यासाठी सर्वपक्षीय आंदोलनाची तयारी

पिंपरी-चिंचवड, दि. ६ एप्रिल – जुना पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे टोल नाका अनधिकृत असून, आयआरबीनं टोलनाका त्वरित बंद करावा, या मागणीसाठी तळेगाव दाभाडे शहर परिसरातील सर्वपक्षीय पदाधिकारी एकत्र आले आहेत. टोलनाका बंद करण्याबाबत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी रविवार दिनांक १० एप्रिलला आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची सोमाटणे येथे बैठक झाली. यावेळी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे, मिलिंद अच्युत, कल्पेश भगत, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, गणेश काकडे, अरुण माने, आशिष खांडगे, शिवसेना शहर प्रमुख दत्ता भेगडे, देव खरटमल, मुन्ना मोरे, मनसेचे नेते सचिन भांडवलकर, भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संतोष दाभाडे, शहराध्यक्ष रवींद्र माने, माजी नगराध्यक्ष राजेंद्र जांभूळकर आदी उपस्थित होते.

जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांनी सोमाटणे टोलनाका अनधिकृत असल्याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात कागदपत्रे सादर केली आहेत. त्यानंतर एमएसआरडीसी आणि आयआरबीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमाटणे टोलनाक्याबाबत सर्व कागदपत्रे दोन दिवसात सादर करण्याचे आश्वासन दिले. सोमाटणे टोलनाका अनधिकृत आहे, तो त्वरित हटवावा अथवा टोलनाका अनधिकृत की अधिकृत याबाबत निकाल लागेपर्यंत टोलनाका बंद ठेवावा, अशी मागणी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी केली. दोन दिवसात आयआरबी आणि एमएसआरडीसीचे म्हणणे ऐकून त्यानंतर आंदोलनाची दिशा ठरणार आहे.