आयुक्तांकडून सुडबुद्धीने कारवाई   उपायुक्त झगडे यांचा आरोप 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

आयुक्तांकडून सुडबुद्धीने कारवाई   उपायुक्त झगडे यांचा आरोप 


 
पिंपरी, (प्रबोधन न्यूज ) -  अतिरिक्त आयुक्तपदाचा मॅटमध्ये सुरू असलेला वाद आणि न्यायालयाने आयुक्तांना पाठविलेल्या नोटीसमुळे मला शासन सेवेत परत पाठविण्याचे पत्र महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी नगरविकास विभागाला पाठवले आहे. आयुक्तांनी सुडबुद्धीने कारवाई केल्याची मला शंका वाटते, अशी प्रतिक्रिया उपायुक्त स्मिता झगडे यांनी दिली आहे. तसेच आयुक्तांनी शासनाला पाठवलेले पत्र चुकीचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
 
उपायुक्त स्मिता झगडे यांची अर्जित रजा मंजूर नसताना परस्पर परदेशात गेल्याचे आयुक्त सिंह यांनी शासनाला पाठविलेल्या पत्रात म्हटले होते. तसेच झगडे यांना महापालिकेत 5 वर्षे 5 महिने झाले असून, त्यांना शासन सेवेत परत घ्यावे, असे पत्र आयुक्त सिंह यांनी राज्याच्या नगरविकास विभागाला नुकतेच पाठविले आहे.
 
याबाबत उपायुक्त झगडे यांनी म्हटले आहे की, माझ्याकडे असलेल्या नागरी सुविधा केंद्र या विभागाचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप आहेत. नियमानुसार मी त्यांच्याकडून रजा मंजूर करून घेतली होती. रजा मंजूर झाल्याशिवाय परदेशात जाण्यासाठी व्हिसा मिळत नाही. मात्र, परदेशात गेल्यानंतर आयुक्तांनी रजा नामंजूर केल्याचा ई-मेल मला प्रशासनाने पाठविला. तो मेल मी उशिराने बघितला. तसेच मी अतिरिक्त आयुक्त पदासंदर्भात मॅट आणि उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच न्यायालयाने आयुक्तांना पाठविलेल्या नोटीसमुळे माझ्यावर आयुक्तांनी सुडबुद्धीने कारवाई केल्याची मला शंका वाटत आहे. पालिकेत मला उपायुक्त म्हणून तीन वर्षे पूर्ण झाले नसून शासनाला पाठवलेले पत्र चुकीचे आहे. तसेच माझ्याकडे दुय्यम दर्जाचा पदभार दिल्याचेही झगडे यांनी म्हटले आहे.