एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये एमबीए अर्ज पडताळणी केंद्र सुविधा

एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये एमबीए अर्ज पडताळणी केंद्र सुविधा
पिंपरी, (प्रबोधन न्यूज )  - पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) निगडी येथील एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (एसबीपीआयएम) येथे एमबीए आणि एमएमएस २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरिता एमबीए आणि एमएमएस अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेचे अर्ज पडताळणी केंद्र (स्क्रूटीनी सेंटर) उपलब्ध करून देण्यात आले आहे. आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या एसबीपीआयएम महाविद्यालयात या फॅसिलिटेशन सेंटर मध्ये विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरणे, कागदपत्रांची पडताळणी करणे यासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. एसबीपीआयएम मध्ये एमबीए, एमएमएस फॅसिलिटेशन सेंटर हे ७ जुलै पर्यंत सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत चालू राहणार आहे. या सेवेचा इच्छुक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर यांनी केले आहे.