आयकर विभागाच्या धाडीत व्यापाऱ्याच्या घरातील नोटा मोजता मोजता रात्र सरली !

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

आयकर विभागाच्या धाडीत व्यापाऱ्याच्या घरातील नोटा मोजता मोजता रात्र सरली !

कानपूर - 

उत्तर प्रदेशातील कानपूरमधील व्यापारी पीयूष जैन यांच्या घरी आणि कार्यालयावर आयकर विभागाने छापे मारले आहेत. या छापेमारीवेळी आयकर विभागाला कपाटं भरून नोटा सापडल्या आहेत. इतका पैसा पाहून स्वत: आयकर विभागाचे अधिकारी चक्रावून गेले. 

 
पीयूष जैन हे कानपूरच्या कन्नौज येथे राहतात. गुरुवारी त्यांच्या कार्यालय आणि घरी छापे मारण्यात आले. यावेळी त्यांच्या घरातील कपाटांमध्ये नोटा खच्चून भरलेले असंख्य बॉक्स सापडले. या नोटा एवढ्या मोठ्या प्रमाणात होत्या की आयकर विभागाला या नोटा मोजण्यासाठी चार मशीन मागवाव्या लागल्या.

गुरुवारी छापा मारल्यानंतर या नोटांचे बॉक्स ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर नोटा मोजण्यास सुरुवात झाली. चार अत्याधुनिक मशीन असूनही रात्रभर या नोटा मोजाव्या लागल्या. तब्बल 24 तासांपासून नोटा मोजण्याचं काम सुरू आहे. नोटा मोजता मोजता अधिकाऱ्यांचे खांदे आणि हात दुखले आहेत. जेवण करण्यासाठीही त्यांना फुरसत मिळत नाहीये. पण नोटा काही कमी होताना दिसत नाहीये.

जैन हे पान मसाला समूहाचे संस्थापक आहेत. त्यांचा परफ्यूमचाही व्यवसाय आहे.  त्यांच्या सात ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. या छापेमारीत 150 कोटी रुपयांची अघोषित संपत्तीचा खुलासा झाला आहे. तसेच आयकर विभागाने 90 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.

आयकर विभागाने जैन यांच्या कन्नौज येथील घर, कार्यालय, पेट्रोल पंप आणि कोल्ड स्टोरेजवर एकसाथ छापेमारी केली. त्याशिवाय मुंबईतील शोरुम आणि कार्यालयावरही छापेमारी केली आहे. त्याशिवाय डीजीजीआयच्या गुजरात आणि मुंबईच्या पथकांनी सकाळी 10 वाजता छापेमारी सुरू केली आहे.