हजला जाऊन आल्यावर का सोडले मोहम्मद रफींनी गायन ?

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

हजला जाऊन आल्यावर का सोडले मोहम्मद रफींनी गायन ?
मुंबई -

मखमली आवाजाचा बादशाह आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील सदाबहार गायक मोहम्मद रफी यांची आज जयंती आहे. त्यांचा जन्म 24 डिसेंबर 1924 रोजी झाला. रफी साहेबांनी प्रेम, दु:ख, सुख, देशभक्ती, भजन, बालगीत अशी जवळपास प्रत्येक मूडची गाणी गायली. त्यांना शहंशाह-ए-तरन्नम या नावानेही ओळखले जात होते. रफी साहेब कमी बोलके, विनम्र आणि गोड स्वभावाचे होते. रफी साहब आपल्या गावात फकीरांच्या गाण्याची नक्कल करत गाणे शिकले आणि एक वेळ अशी आली जेव्हा ते देशातील सर्वाधिक ऐकले जाणारे गायक बनले. पण तुम्हाला माहीत आहे का की रफी साहेबांनी हजहून परतल्यानंतर गाणे सोडले होते.

मौलवींच्या सांगण्यावरून गाणे केले बंद 
मोहम्मद रफी जेव्हा त्यांच्या कारकिर्दीच्या शिखरावर होते, तेव्हा त्यांनी मौलवींच्या सांगण्यावरून चित्रपटांमध्ये गाणे म्हणणे बंद केले. हजला गेले असताना हा प्रकार घडला. तो परत आल्यावर त्याला काही लोकांनी सांगितले की, आता तू हाजी झाला आहेस त्यामुळे तू आता सर्व गाणे बंद कर.लोकांना याची माहिती मिळताच संपूर्ण बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली.

मात्र, खूप समजावून सांगितल्यावर रफी साहेब राजी झाले आणि त्यांनी पुन्हा गायला सुरुवात केली. रफी साहेबांनी हिंदीशिवाय अनेक भारतीय भाषांमध्येही गाणी गायली आहेत. जवळपास 26 हजार गाणी गाण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.