आपल्या काळातील सर्वात श्रीमंत नायिका दुर्गा खोटे ! पतीच्या निधनानंतर चित्रपटात इतिहास रचला
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पाच दशके आपल्या दमदार अभिनयाने चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री दुर्गा खोटे यांची आज जयंती. दुर्गा खोटे यांचा जन्म १४ जानेवारी १९०५ रोजी मुंबईत झाला. त्यांच्या काळात इंडस्ट्रीतील सर्वात शिक्षित अभिनेत्रींमध्येही त्यांची गणना होते. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत महिलांसाठी नवे आयाम निर्माण केले. त्या काळात स्त्रियांची भूमिकाही पुरुषच बजावत असत. अशा काळात दुर्गा खोटे यांनी चित्रपटात प्रवेश केला आणि नायिका म्हणून आपला ठसा उमटवला.
दुर्गा खोटे यांनी 1931 मध्ये फरेबी जलाल या मूक चित्रपटात पहिल्यांदा काम केले होते. यानंतर त्यांनी विधुर, अमर ज्योती आणि वीर कुणाल यांसारख्या चित्रपटात काम केले. दुर्गा खोटे यांनी मुख्य अभिनेत्रीपासून आईपर्यंत भूमिका केल्या. मात्र, त्यांचा प्रवास सोपा नव्हता. दुर्गाने जेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीत येण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या कुटुंबात खळबळ उडाली.
जेव्हा दुर्गा 18 वर्षांच्या होत्या, तेव्हा त्यांचे लग्न एका श्रीमंत कुटुंबात झाले होते. विश्वनाथ खोटे असे दुर्गा यांच्या पतीचे नाव होते. दोघांनाही दोन मुलगे होते. विश्वनाथ हे मेकॅनिकल इंजिनीअर होते. दुर्गा २४ वर्षांच्या असताना त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. या कठीण प्रसंगातून मार्ग काढण्यासाठीच त्या चित्रपटांकडे वळल्या.
दुर्गा शिकलेल्या होत्या. पैसे कमावण्यासाठी दुर्गा यांनी प्रथम शिकवणीचा सहारा घेतला. यानंतर दुर्गा यांनी दुसरे लग्न केले, पण ते लग्नही फार काळ टिकले नाही. त्यादरम्यान त्यांचा लहान मुलगा हरिन मरण पावला. या दु:खात त्या खूप तुटल्या होत्या. हिंदी आणि मराठीशिवाय दुर्गाने बंगाली चित्रपटांमध्येही काम केले. 'मुघल-ए-आझम' चित्रपटातील जोधाबाई ही दुर्गा खोटेंची सर्वात अविस्मरणीय भूमिका होती.
50 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 200 हून अधिक चित्रपट केले. दुर्गा खोटे यांनी चित्रपट निर्मितीतही नशीब आजमावले. चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. दुर्गा या त्यांच्या काळातील सर्वात महागडया आणि श्रीमंत अभिनेत्री होत्या.