धावत्या बसमध्ये जन्मलेल्या बाळांना तेलंगणा सरकारने दिली आजन्म मोफत प्रवासाची भेट ! 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

धावत्या बसमध्ये जन्मलेल्या बाळांना तेलंगणा सरकारने दिली आजन्म मोफत प्रवासाची भेट ! 
हैदराबाद -
तेलंगाणा महामंडळाच्या धावत्या बसमध्ये वेगवेगळ्या दोन घटनांमध्ये महिलांनी मुलींना जन्म दिला. धावत्या सार्वजनिक बसमध्ये जन्माला आलेल्या दोन्ही मुलींना तेलंगाणा सरकारने आजन्म मोफत प्रवासाची भेट दिली आहे. सुरक्षित प्रवासाचं ब्रीद तेलंगाणा महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपत्कालीन परिस्थितीत जपल्याचं सांगत मुख्यमंत्री केसीआर राव यांनी चालक-वाहकांवर कौतुकांची थाप टाकली आहे.

तेलंगाणा राज्य परिवहन महामंडळाद्वारे आंतरराज्यीय बस सेवेसोबतच हैदराबाद शहराअंतर्गत वाहतूक सेवा पुरविली जाते. परिवहन महामंडळाच्या बसमध्ये तेलंगाणातील मेहबूबनगर आणि सिद्धापेठ जिल्ह्यात प्रसूतीच्या घटना समोर आल्या. वाहकाच्या सर्तकतेमुळे प्रवाशी गर्भवती महिलांची डिलिव्हरी गाडीत सुखरुप पार पडली. दोन वेगवेगळ्या गाड्यांमध्ये घडलेल्या प्रसूतीच्या बातम्यांनी समाज माध्यमांचे विश्व व्यापून टाकले आहे.

तेलंगाणा सरकारने जन्माला आलेल्या मुलींना आजन्म मोफत प्रवासाची सवलत बहाल केली आहे. तेलंगाणा परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व्हीसी सज्जनार यांनी मुलींना आंतरराज्यीय प्रवासासोबत विमानतळ स्पेशल बस गाड्यांमध्ये सवलत लागू असल्याचे ट्विटरद्वारे घोषित केले आहे.

महबूबनगर जिल्ह्याच्या पेद्दा कोत्तापल्ली गावानजीक धावत्या बसमध्ये 30 नोव्हेंबरला महिलेने मुलीला जन्म दिला. तर सात डिसेंबरला सिद्धी पेठ जिल्ह्यामध्ये धावत्या बसमध्येच महिलेच्या सुखरुप प्रसूतीची घटना समोर आली. गर्भवती महिलांना प्रवासादरम्यान त्रास जाणवू लागला. वेदनेने व्याकूळ झालेल्या महिलांकडे सहप्रवाशांनी वाहकाचे लक्ष वेधले. त्यावेळी बसच्या चालक व वाहकांनी प्रसंगावधान राखत सुखरूप प्रसूती पार पाडली. डिलिव्हरीनंतर तत्काळ जिल्हा सरकारी रुग्णालयात दोन्ही महिलांसह नवजात बालकांना पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.

तेलंगाणा सरकारने परिवहन महामंडळाची सूत्रे व्ही. एस. सज्जनार यांच्याकडे सोपविली आहेत. आयपीएस अधिकारी असलेले सज्जनार आपल्या दबंग कारवाईसाठी ओळखले जातात. तेलंगाणा परिवहन महामंडळाचा कायापालट करण्यासाठी सज्जनार यांनी मोठी पावले उचलली आहेत. सुरक्षित प्रवासासोबत महामंडळाला नफ्यात आणण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. तेलंगाणा महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांना आठवड्यातून एक दिवस महामंडळाच्या गाड्यांमधून प्रवास करणे सक्तीचे केले आहे.