सावधान ! ओमिक्रॉन हळूहळू पाय पसरतोय ! दिवसभरात आठ बाधित आढळले; राज्यात एकूण 28

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

सावधान ! ओमिक्रॉन हळूहळू पाय पसरतोय ! दिवसभरात आठ बाधित आढळले; राज्यात एकूण 28
मुंबई  -
राज्यात आज दिवसभरात आठ जणांचा ओमिक्रॉन (Omicron) अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यातील सात जण मुंबईचे तर एक रुग्ण वसई-विरारमधला असल्याचं समजतंय. एकूण रुग्णांमध्ये 3 महिला आणि 5 पुरुषांचा समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ओमिक्रॉन हळूहळू पाय पसरतोय, हे स्पष्ट झाले आहे. 

राज्यात ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या वाढत चाललीय. आकडा एकूण 28  वर पोहोचलाय. काल सापडलेल्या रुग्णांच्या अपडेटनुसार, ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांपैकी 9 जणांची आरटीपीसीआर (RTPCR)चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली होती. आतापर्यंत राज्यात ओमिक्रॉनचे मुंबईत 7, पिंपरी-चिंचवडमध्ये 10, पुणे महापालिका हद्दीत 2, कल्याण-डोंबिवलीत 1, वसई-विरारमध्ये 1, नागपूर 1 आणि लातूरमध्ये 1 रुग्ण आढळून आला.

काल लातूर जिल्ह्यात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला. हा रुग्णही दुबईवरुन भारतात आला होता. या 35 वर्षीय रुग्णात लक्षणं आढळून आली होती. लातूर महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये या रुग्णावर उपचार सुरू असल्याची माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली. परदेशातून आलेल्या 51 पैकी एका रुग्णाचा स्वॅब तपासणीसाठी पाठवला होता. त्याचा अहवाल काल आल्यानंतर तो रुग्ण ओमिक्रॉन पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं. दरम्यान या रुग्णाची प्रकृती चांगली असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली. हा रुग्ण औसा इथला रहिवासी आहे. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.