नाना काटे यांच्याकडून बैठका, पदयात्रा अन् गाठीभेटीचा धडाका

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

नाना काटे यांच्याकडून बैठका, पदयात्रा अन् गाठीभेटीचा धडाका

प्रचारात जोरदार मुसंडी; सर्वसामान्यांचा मोठा पाठींबा

चिंचवड :- चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी मंगळवारी (दि. १४) दिवसभर पदयात्रा, गाठीभेटी आणि बैठका घेऊन प्रचारात जोरदार आघाडी घेतली. आज झालेल्या पदयात्रांमध्ये महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी हजेरी लावत एकजुटीचा प्रत्यय आणून दिला. त्यामुळे प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात तरी नाना काटे यांनी वातावरण ढवळून काढल्याचे आज दिसून आले.

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी आज क्रांतीनगर, काशीद वस्ती, जवळकर नगर, भैरवनाथ नगर, आनंद नगर, अनंत नगर, प्रभात नगर, वैदु वस्ती, लक्ष्मी नगर, पिंपरी गुरव गावठाण, वेस्ट साईड काऊंटी, भालेकर नगर, अमृता कॉलनी, भाऊ नगर, शिवनेरी कॉलनी, काशीद नगर, देवकर पार्क, सुवर्ण पार्क आदी ठिकाणी नागरिकांच्या व कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. नाना काटे यांच्या सोबत महाविकास आघाडीतील घटक पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, काँग्रेस व आरपीआयसह इतर पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते.

मतदारसंघाच्या विविध भागांमध्ये आज दिवसभरात झालेल्या गाठीभेटी आणि पदयात्रांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी माता-भगिनींकडून नाना काटे यांचे औक्षण केले जात होते. आकर्षक रांगोळ्यांनी मार्ग सजविण्यात आले होते. फटाक्यांच्या आतषबाजीने परिसर दणाणून जात होता. विविध गल्ली व रस्त्यांवरून पायी चालत नाना काटे यांनी नागरिकांच्या गाठी-भेटी घेतल्या. मतदारांकडून शुभेच्छांचा स्वीकार करीत नाना काटे यांनी त्यांची आपुलकीने विचारपूस केली. सर्वसामान्य नागरिक, मतदार आणि माता भगींनींकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे प्रचाराच्या उत्साहात भरच पडत होती. आज दिवसभाराच्या प्रचारादरम्यान 'राष्ट्रवादी पुन्हा'चीच प्रचिती आल्याने राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला असल्याचे स्पष्ट झाले.