'या' कारणामुळे काजवे रात्रीच चमकतात !

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

'या' कारणामुळे काजवे रात्रीच चमकतात !
नवी दिल्ली - 

रात्रीच्या अंधारात फायर फ्लाय अर्थात काजवे उडतांना पाहून प्रत्येकजण आनंदित होतो. ते शहरांमध्ये क्वचितच दिसतात, परंतु ग्रामीण भागात काजवे बऱ्याच प्रमाणात आढळतात.  तथापि, आता खेड्यांमध्येही काजव्यांची संख्या हळूहळू कमी होत आहेत.  आपण कधी विचार केला आहे का की काजवा रात्री का चमकतो?  चला तर मग, जाणून घेऊया यामागील दोन रंजक कारणे. 

वास्तविक, काजवे चमकण्यामागे त्यांचे मुख्य उद्देश म्हणजे त्यांच्या मादी जोडीदारांना आकर्षित करणे हा आहेच, पण स्वत: साठी अन्न शोधणे, हे देखील दुसरे कारण आहे. काजव्यांचा प्रकाश हिरवा, पिवळा आणि लाल अशा तीन रंगांचा असतो.  मादी काजवा जंगलातल्या झाडांच्या फांदीवर  अंडी देतात.  आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की काजव्यांची  अंडी देखील चमकतात.
आपल्याला काजव्यांबद्दल जास्त माहिती नसल्यास, आपण ही काजव्यांमधील नर किंवा मादी ओळखू शकत नाही. मादी काजव्यांना पंख नसतात, म्हणून ते एकाच ठिकाणी चमकतात, तर नर काजव्यांना दोन पंख असतात, म्हणून ते उडत असताना चमकतात.
जरी भारतात मोठ्या प्रमाणात काजवे आढळत असले तरी जास्त प्रकाशमय चमकणारे काजवे बहुतांश वेस्ट इंडीज आणि दक्षिण अमेरिकेत आढळतात.
रॉबर्ट बायल नावाच्या वैज्ञानिकाने 1667 मध्ये काजव्यांचा शोध लावला.  पूर्वी असा विश्वास होता की काजव्यांच्या शरीरात फॉस्फरस असल्यामुळे  ते चमकत राहतात.  परंतु नंतर वैज्ञानिकांनी हे नाकारले.  1794 मध्ये इटालियन शास्त्रज्ञ स्पेलनझानी यांनी हे सिद्ध केले की काजवे फॉस्फरसमुळे नव्हे तर ल्युसिफेरेस नावाच्या प्रोटीनमुळे चमकते.  हे प्रथिने प्रामुख्याने पचनाशी संबंधित असतात.