महापालिकेची सीसीटीव्ही कॅमेरे फेज-२ निविदा प्रक्रिया सदोष ! - आमदार अण्णा बनसोडे यांचा आक्षेप; निविदा रद्द करण्याची मागणी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

महापालिकेची सीसीटीव्ही कॅमेरे फेज-२ निविदा प्रक्रिया सदोष ! - आमदार अण्णा बनसोडे यांचा आक्षेप; निविदा रद्द करण्याची मागणी


- महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना सूचना ; पारदर्शी कारभार करा



    पिंपरी , (प्रबोधन न्यूज) -  पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातून अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याबाबत आपल्या भूमिकेचे स्वागत आहे. मात्र, कॅमरे बसवण्याच्या कामात पारदर्शीपणा नाही, असा संशय निर्माण झाला आहे, ही गंभीर बाब आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया तात्काळ रद्द करावी आणि नव्याने पारदर्शीपणे राबवावी, अशी मागणी आमदार अण्णा बनसोडे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, शहरात सुमारे ३ हजार सीसीटीव्ही कॅमेरे तैनात करण्यात येणार आहेत. सुरूवातीला स्मार्ट सिटी योजनेतून पहिल्या टप्प्यातील कॅमेरे तैनात केले. त्यानंतर फेज- १ आणि फेज- २ असे तिसऱ्यांदा कॅमेरे बसवण्याचे काम काढले आहे. सुरवातीच्या दोन टप्प्यांत बसवलेले ७० टक्के कॅमेरे बंद अवस्थेत आहेत. ते पूर्ण क्षमतेने सुरू करण्यापूर्वीच प्रशासनाने तिसऱ्यांना सुमारे १७० कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया राबवली आहे.

विशेष म्हणजे, निविदा प्रक्रिया राबवित असताना संबंधित सल्लागार कंपनी आणि प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे मिलीभगत करुन विशिष्ठ ठेकेदाराला व ठराविक कंपन्यांचे साहित्यच खरेदी करणे भाग पडेल अशा हेतुने नियमावली तयार केली आहे. परिणामी, निविदा प्रक्रियेमध्ये सशक्त स्पर्धा होत नाही. ठेकेदारधार्जिण्या भूमिकेमुळे आतापर्यंत प्रशासनाने सुमारे ४०० कोटी रुपये केवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यावर खर्च केला आहे. माझ्या मते, ही सर्वसामान्य नागरिकांच्या कररुपी पैशाची सरळ उधळपट्टी आहे, असा आक्षेपही आमदार अण्णा बनसोडे यांनी नोंदवला आहे.

तसेच, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वयीत करण्याबाबत पत्रव्यहावर केला होता. मात्र, त्याला सकारात्मक प्रतिसाद देण्यास महापालिका प्रशासन कमी पडले. अद्याप बहुतेक कॅमेरे बंद अवस्थेत आहेत. आता नवीन निविदा काढून विशिष्ठ ठेकेदाराला पोसण्याचे काम प्रशासन करीत असेल, तर ही बाब पिंपरी-चिंचवडकर कदापि सहन करणार नाहीत, असा इशारा आमदार बनसोडे यांनी दिला आहे.
*
निविदा पूर्व बैठकीत कंपन्यांच्या हरकती…

दि. ३१ मे रोजी सीसीटीव्ही कॅमरे बसवण्याच्या फेज- २ च्या कामासाठी प्रशासनाकडून निविदा पूर्व बैठक घेण्यात आली. त्यामध्ये देशभरातील ४० हून अधिक ठेकेदार आणि पुरवठादार कंपन्यांनी सहभाग नोंदवला. मात्र, सल्लागार कंपनीने तशाप्रमाणे पक्षपातीपणा केला आहे. एक-दोन पुरवठादार कंपन्याच पात्र ठरतील, अशा अटी व शर्ती घातल्या आहेत. तांत्रिक बाबींचा समाविष्ट करताना विशिष्ठ पुरवठादार कंपनीच्या हितासाठी तजवीज केली आहे, असे निदर्शनास आले आहे. काही कंपन्यांनी प्रशासनाला त्याबाबत लेखी हरकती नोंदवल्या आहेत, असेही आमदार अण्णा बनसोडे म्हटले आहे.
**

याबाबत  आमदार अण्णा  बनसोडे  यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले कि,  महापालिका प्रशासकीय प्रमुख या नात्याने आयुक्त शेखर सिंह यांनी सीसीटीव्ही कॅमेरा निविदा प्रक्रियेत स्वत: लक्ष घालावे. ज्यामुळे निविदा प्रक्रियेमध्ये कामाचा दर्जा आणि गुणवत्ता अबादित राहील व जास्तीत-जास्त ठेकेदारांना आणि साहित्य पुरवठादार कंपनींना स्पर्धेत सहभागी होता येईल. प्रसंगी सदर सदोष निविदा प्रक्रिया स्थगित करावी आणि सल्लागार व संबंधित अधिकाऱ्यांना पारदर्शीपणे निविदा प्रक्रिया राबवण्याची सूचना करावी, अशी आमची आग्रही मागणी आहे.