थंडीचा पारा वाढताच पुणेकरांचा मद्यपानाकडे कल वाढला !

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

थंडीचा पारा वाढताच पुणेकरांचा मद्यपानाकडे कल वाढला !
पुणे - 
अवकाळी पावसानंतर शहरातील थंडीचा पारा चांगलाच वाढाला आहे, या कडाक्याच्या थंडीबरोबरच जिल्ह्यातील मद्यविक्रीमध्येही वाढ झालेली दिसून आली आहे. उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार गतवर्षीच्या नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत यंदा देशी मद्याच्या 3.7  तर विदेशी मद्याची विक्री 4.2 टक्क्यांनी वाढली आहे. इतकंच नव्हे तर बिअरच्या विक्रीत थेट 16.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. वाईनच्या विक्रीत 11.4 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे.

नोव्हेंबर महिन्यातली पुणे जिल्ह्यातील मद्य विक्री (आकडे लिटरमध्ये)

मद्यप्रकार               2020 -21                                  2021- 22                    विक्रीत वाढ (टक्के)

देशी दारू          25 लाख 56 हजार 916             26 लाख 51 हजार 123             3.7

विदेशी दारू      30  लाख 86  हजार269            32 लाख 15  हजार665             4.2

बिअर               31 लाख 23  हजार 605            36  लाख 40  हजार 865            16.6

वाईन                1 लाख 31हजार 307                1 लाख 46 हजार293                 11. 4  

दरवर्षी हिवाळ्यात मद्य विक्रीचे प्रमाण वाढताना दिसत. मात्र यंदा अपेक्षेपेक्षा अधिक मद्याची विक्री झाली आहे. नेहमीच्या तुलनेत यंदा मद्यपानाचे प्रमाण वाढले असल्याचेही दिसून आले आहे. मात्र मद्याचे अतिरिक्त सेवन आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. अतिरिक्त मद्याचे सेवनामुळे हृदयविकाराचा धोका वाढण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे आरोग्याबाबत सजग राहत मद्याचे सेवन करावे असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे

अतिमद्यपानामुळे घाम फुटणे, चक्कर, थकवा, अस्वस्थता, छातीत दुखणे असे त्रास जाणवू शकतात. ही सर्व हृदयविकाराची लक्षणे असू शकतात. मद्यपानामुळे शरीरातील उष्णता आणि कमी तापमान यांचे संतुलन बिघडल्यास हायपोथर्मियाची स्थिती उद्भवू शकते.