बदलत्या तंत्रज्ञानानुसार स्वतःमध्ये बदल घडवून आणा - व्याख्याते भूषण आढे


चिंचवड , (प्रबोधन न्यूज ) -  चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटीचे प्रतिभा इन्स्टिट्युट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटचा एमसीए व एमबीए विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय इंडक्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्याचे उद्घाटन व्हेरॉकचे मनुष्यबळ विभागाचे उच्च अधिकारी व व्याख्याते भूषण आढे यांनी केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावरती संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, एम.बी.ए. विभागाचे संचालक डॉ. सचिन बोरगावे, विभाग प्रमुख प्रा. गुरूराज डांगरे, प्रा. मनिष पाटणकर उपस्थित होते. या कार्यक्रमात व्याख्याते मोहन नायर, सॉफ्टस्कील प्रशिक्षक जयश्री फडणवीस आदींनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.


व्याख्याते भूषण आढे पुढे मार्गदर्शन करताना म्हणाले, तुमचे दोन शैक्षणिक वर्षात कार्पोरेट जगतचा पाया तुमच्या शिक्षणात आहे. स्पर्धा आहे यशस्वीसाठी होण्यासाठी नाविण्यपूर्ण शिक्षणाची कास अंगिकारा भविष्यात नोकरी का व्यवसाय करणार याची खुणगाठ आत्ताच बांधा, वेळेचा अपव्यय टाळा, वर्तणूक चांगली ठेवा, फेसबुक चॅटींग, मोबाईल पासून दूर रहा. तुमच्यातील चुका कशा टाळता येतील, याचे आत्मपरिक्षण स्वतःच करा. अनेकांना इंग्रजी समजते पण बोलताना अडखळतात ते टाळा, कॉर्पोरेट जगतात जाण्यासाठी टपोरी भाषाशैली ऐवजी मराठी, हिंदी भाषेबरोबर इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवा. या दोन वर्षात जे आत्मसात करणार तेच भविष्यात कामाला येणार याची जाणीव ठेवा. पदवीग्रहण नंतर स्पर्धात्मक विश्वात पदार्पण करणार आहात, याची जाणीव ठेवत पाया भक्कम करा. देहबोली सकारात्मक ठेवा, येणार्याद आव्हानापासून दूर जावू नका, मुलाखतीच्या वेळी वागणूक, संभाषण कौशल्य इतरांच्यापेक्षा तूसभर तुम्ही वरचढ असाल तरच, संधी मिळणार आहे. यासाठी तुमच्यातील नैराश्य दूर करून उल्हासीत देहबोली व व्यक्तिमत्त्व घडवा, या प्रवासाची सुरूवात आजपासूनच करून लक्षात ठेवा, नोकरीची संधी मिळते पण, टिकविणे फार महत्त्वाचे असते.


व्याख्याते मोहन नायर म्हणाले, आज शहरापेक्षा ग्रामीण भागात भयावह स्थिती आहे. वेळेवर अभ्यास, पुस्तक वाचन करता का? बदलत्या काळानुसार स्वतःमध्ये बदल घडवून आणा. भविष्यात यशस्वी व्हायचे असेल तर, ध्येय निश्चिती ठेवा, अथक परिश्रम करून उद्दीष्ट साध्य करा. यासाठी सुक्ष्म विचारसरणी अंगिकारा.


संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा म्हणाले, आई-वडीलांचे स्वप्न साकार करण्यासाठी ज्ञान ग्रहण करा. जिद्द, चिकाटी, परिश्रमाची तयारी ठेवा, अधिकाधिक शैक्षणिक पुस्तके वाचन करावे. मला जमणार नाही, हा विचार मनातून हद्दपार करा, अथक प्रयत्नातून कोणतीही असाध्य गोष्ट साध्य करता येथे याची खूण गाठ बांधा व महत्वकांक्षा पूर्ण करा.


प्रास्ताविकात संचालक डॉ. सचिन बोरगावे म्हणाले, दोन वर्षे महत्त्वाचे असून सातत्यपूर्ण अभ्यास करा, नवनवीन ज्ञान आत्मसात करा., शिकण्याची मिळालेली संधी सोडू नका. विषय समजून घ्या, भेडसावणारी प्रश्ने विचारा, उल्हासीत रहा. वेळेचे अचूक व्यवस्थापन करा. तुमचे भविष्य तुमच्याच हातात आहे., याची जाणीव ठेवा.


कार्यक्रमाची सूत्रसंचालन डॉ. महिमा सिंग यांनी केले., आभार डॉ. निजी साजन यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. तूलिका चटर्जी, प्रा. प्रिया माथुरकर, प्रा. कविता दिवेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.