सदाखोत पिंपरी चिंचवडला आल्यास समाचार घेऊ - काशिनाथ नखाते
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
![सदाखोत पिंपरी चिंचवडला आल्यास समाचार घेऊ - काशिनाथ नखाते](https://prabodhannews.com/uploads/images/2023/07/image_750x_64ad18de8c6d1.jpg)
प्रतिमेला मारले जोडे
पिंपरी, (प्रबोधन न्यूज ) - भारताचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्यावरती खालच्या शब्दात टीका करणाऱ्या सदा खोत यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे आज पिंपरी येथे जोडे मारून निषेध करण्यात आला.
यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते म्हणाले की सदा खोत यांना राजू शेट्टी व गोपीनाथ मुंडे यांच्या आशीर्वादाने त्यांची लायकी नसताना मंत्रिपद मिळाले मात्र या त्यांनी त्यांच्याशी दगा केला. वास्तविक सदा खोत व त्यांच्या मुलाची पंचायत समिती अथवा जिल्हा परिषद मध्ये सुद्धा निवडून येण्याची कुवत नसतानाही त्यांना केवळ दुसऱ्याच्या आशीर्वादाने मिळालेले स्वतः कृषिमंत्री असताना सुद्धा महाराष्ट्रातल्या शेतकरी हिताचे एकही काम केले नाही मात्र केवळ पवार साहेबांवरती टीका करून भाजपकडून काहीतरी तुकडा मिळेल का ? यासाठी त्यांची धडपड सुरू आहे पवार साहेबावर टीका न करता आता शिल्लक संघटनेचे काम पहावे अशी टीका कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली.
असे कितीही बोलले तरी शरदचंद्र पवार साहेब यांचे कार्यकर्ते महाराष्ट्र राज्यासह देशभरामध्ये पाळेमुळे रोवलेले आहेत त्यामुळे पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पवार साहेबांच्या आशीर्वादाने व नेतृत्वात सर्व निवडणुका यशस्वी होतील. यावेळी कामगार नेते काशिनाथ नकाते,ओमप्रकाश मोरया,इरफान चौधरी, नाना कसबे, सलीम डांगे, आबा शेलार, जय जाधव हरी भोई आदी उपस्थित होते.