ओमिक्रॉन संकट : भारतीय टीमचा दक्षिण आफ्रिका दौरा अनिश्चित ?
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
![ओमिक्रॉन संकट : भारतीय टीमचा दक्षिण आफ्रिका दौरा अनिश्चित ?](https://prabodhannews.com/uploads/images/2021/12/image_750x_61a75720b95dd.jpg)
लवकरच भारतीय टीमची दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी निवड प्रक्रिया पार पडणार होती, मात्र कोरोनाचा नव्या विषाणुने घातलेल्या थैमानामुळे भारतीय संघाची निवड तुर्तास राखून ठेवण्यात आली आहे. बीसीसीआय या दौऱ्याबाबत सरकारच्या परवानगीची वाट बघत आहे, सरकार काय निर्णय घेईल हे पाहूनच भारतीय टीमच्या दौऱ्याबाबत योग्य निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे अजून तरी या दौऱ्याबाबत अनिश्चितता कायम आहे. 9 डिसेंबरला टीम इंडिया या दौऱ्यासाठी रवाना होणार होती. खेळाडुंना चार्टड प्लेनने या दौऱ्यासाठी पाठवण्याची शक्यता आहे. ठरलेल्या वेळापत्रकानुसार पहिला कसोटी सामना 17 डिसेंबरला नियोजित आहे. हे वेळापत्रक तसचं राहणार की यात काही बदल होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
कानपूरच्या कसोटी सामन्यानंतर टीमची निवड होणार होती. त्यात ज्या खेळाडुंना आराम दिला आहे, त्यांना काही दिवस क्वारंटाईन व्हायचं होतं. रोहित शर्मा, ऋषभ पंत, मोहमद्द शामी, के. एल. राहुल, शार्दुल ठाकूरसारखे काही खेळाडू सध्या ब्रेकवर आहेत. या खेळाडुंना अजून बीसीसीआयकडून क्वारंटाईन होण्याबाबत कोणत्याही सूचना मिळाल्या नाहीत. 3 डिसेंबरला या खेळाडुंना क्वारंटाईन करण्याचं नियोजन होतं. त्यामुळे भारतीय टीमचा हा दौरा कसा असणार याबाबत अजूनही अनिश्चितता आहे.