इंडो अथलेटिक्स सोसायटीतर्फे 1100 सायकलस्वारांची पुणे-पंढरपूर-पुणे वारी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

इंडो अथलेटिक्स सोसायटीतर्फे 1100 सायकलस्वारांची पुणे-पंढरपूर-पुणे वारी

निगडी, (प्रबोधन न्यूज) -  निगडी येथील इंडो  ॲथलेटिक्स  सोसायटीतर्फे सालाबाद प्रमाणे होणाऱ्या पुणे पंढरपूर पुणे सायकल वारीचे शनिवारी 18 जून रोजी देहू येथील गाथा मंदिर येथून प्रस्थान होणार आहे. यंदाचे वर्ष सदर सायकल वारीचे सहाव्या वर्षापासून यावर्षी तब्बल अकराशे हून अधिक सायकल भक्तांचा सहभाग यामध्ये नोंदवण्यात आला आहे.

पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यातर्फे झेंडा दाखवून सुरुवात होईल. आकुर्डी येथील विठ्ठल मंदिर मध्ये मे महिन्यामध्ये सदर वारीसाठी नाव नोंदणी सुरु करण्यात आली होती. फक्त पंधरा दिवसांमध्ये 1000 हून अधिक लोकांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे.

ही वारी १८ जूनला निघेल. ती एक दिवसात देहू ते पंढरपूर असे दोनशे पन्नास किलोमीटर अंतर पार पाडेल. तर दुसऱ्या दिवशी पंढरपूर ते आळंदी अशी परतीची वारी करणार आहेत. सायकल वारी मार्ग- देहू - निगडी - नाशिक फाटा - हडपसर - उरुळी कांचन - भिगवन - इंदापूर - टेंभुर्णी - पंढरपूर आणि दुसऱ्या दिवशी याच मार्गावरून परतीचा प्रवास संपन्न होईल, असे आय ए एस सायकल वारीचे प्रमुख गिरीराज उमरीकर यांच्या तर्फे सांगण्यात आले आहे.