कायमचा प्रश्न सुटला आता पोलीस आयुक्तालय लवकरच वाकडला काळेवाडी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

कायमचा प्रश्न सुटला आता पोलीस आयुक्तालय लवकरच वाकडला काळेवाडी


काळेवाडी फाट्याजवळील पेठ क्र. 39 मध्ये होणार सुसज्ज आयुक्तालय


पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालया साठी वाकड पेठ क्रमांक ३९ मधील १५ एकर जागा देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या ठिकाणी पोलीस आयुक्त
कार्यालय,इतर कार्यालये, कवायत मैदान, क्रीडांगण व निवासस्थाने होणारआहेत. पुणे पोलीस आयुक्तालया तील नऊ पोलीस स्टेशन आणि पुणे ग्रामीण हद्दीतील पाच पोलीस स्टेशन मिळून पिंपरी चिंचवड व परिसरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करण्यात आले. १५ ऑगस्ट २०१८ रोजी
आयुक्तालय कार्यान्वित झाले. आतापर्यंत पोलीस आयुक्तालया साठी हक्काची जागा नसल्याने पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस मुख्यालय, अधिकारी निवासस्थाने, परेड ग्राउंड, खेळाचे मैदान
उपलब्ध होऊ शकले नाही. सध्याचे पोलीस आयुक्त कार्यालय पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेच्या इमारतीत
भाडेतत्त्वावर कार्यान्वित झाले आहे. पोलीस आयुक्तालया साठी ही जागा अपुरी पडत आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस आयुक्तालया साठी जागा मिळण्याबाबत शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला.


शहरातील लोकप्रतिनिधींनी देखील यासाठी सहकार्य केले. या पाठ पुराव्याला यश आले असून पुणे महानगर विकास प्राधिकरण यांच्या मालिकीची वाकड पेठ क्रमांक ३९ येथील १५ एकर जागा
वाणिज्य चालू दर पत्रकानुसार पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड यांना प्रदान करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
ही जागा काळेवाडी फाटा येथे असून हे ठिकाण मध्यवर्ती, प्रशासकीय व नागरिकांच्या दृष्टीने सोयीचे होणार आहे.
या ठिकाणी लवकरच सुसज्ज पोलीस आयुक्त कार्यालय तसेच इतर कार्यालय उभारण्यात येणार आहेत.
पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड