खलिस्तानी अतिरेक्यांचा मोठा घातपात करण्याचा कट उद्ध्वस्त

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

खलिस्तानी अतिरेक्यांचा मोठा घातपात करण्याचा कट उद्ध्वस्त

नवी दिल्ली, दि. 5 मे - खलिस्तानी समर्थक असलेल्या चार संशयित दहशतवाद्यांना हरयाणातील कर्नाल भागातून पोलिसांनी अटक केली आहे. गुरप्रीत, अमनदीप, परमिंदर, भुपिंदर अशी या चार संशयित दहशतवाद्यांची नावं असून हे चौघेही पंजाबचे रहिवासी आहेत. ते एका इनोव्हा कारमधून जाताना त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. हे अतिरेकी तेलंगणातील आदिलाबादेत शस्त्र पुरवठा करण्याच्या तयारीत होते. त्यांनी यापूर्वी नांदेड भागातही शस्त्रास्त्रांची खेप पाठवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 4 खलिस्तानी अतिरेकी गुरुवारी राष्ट्रीय महामार्गावरुन जात असल्याची खबर गुप्तहेर विभागाला मिळाली होती. त्यानंतर पोलिस व सुरक्षा यंत्रणांनी बांसताडा टोल प्लाझाजवळ सापळा रचून इनोव्हा गाडीला तपासणी करण्यासाठी रोखले. त्यात त्यांच्या हाती मोठ्या प्रमाणात दारुगोळा लागला. या अतिरेक्यांकडून एक देशी पिस्तूल, 31 काडतूस, 1.30 लाख रुपयांची रोकड, 3 लोखंडी बॉक्स (प्रत्येकी अडीच किलो वजनाचे) जप्त करण्यात आलेत. पोलिसांनी या बॉक्सची तपासणी केली असता त्यात स्फोटके असल्याचे स्पष्ट झाले.

सुरक्षा यंत्रणांच्या प्राथमिक अंदाजानुसार संशयितांचा पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. आयबी आणि पोलिसांनी केलेल्या आतापर्यंतच्या चौकशीनुसार या घटनेमागं पाकिस्तानचा संबंध असल्याची माहिती समोर येत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बब्बर खालसाच्या संशयित दहशतवाद्यांना पाकिस्तानातून ड्रोनच्या माध्यमातून शस्त्र पुरवण्यात आली होती. पाकिस्तानातील दहशतवादी हविरंदर सिंह रिंडा याच्याशी चौघांचा संबंध असल्याचं सांगितलं जात आहे.

चारही आरोपी पाकिस्तानी अतिरेकी हरविंदर सिंग रिंदा याच्या इशाऱ्यानुसार काम करत होते. रिंदानेच त्यांना शस्त्र पुरवठा केला. त्यानंतर ते हे शस्त्र व दारुगोळा तेलंगणाच्या आदिलाबाद जिल्ह्यात पोहोचवणार होते. या मोबदल्यात त्यांना पैसे देण्यात येणार होते. या अतिरेक्यांनी यापूर्वीही नांदेड परिसरात खेप पोहोचवलेल्याचे स्पष्ट झाले आहे. रिंदा त्यांना ड्रोनद्वारे शस्त्र पुरवठा करत होता. तसेच मोबाईल अॅपद्वारे लोकेशन पाठवत होता. त्यानंतर हे आरोपी त्या लोकेशनवर शस्त्र पुरवठा करत होते.

पंजाबच्या तरन तारन जिल्ह्यात हरविंदर सिंग रिंदाचा जन्म झाला. वयाच्या 11 व्या वर्षी हरविंदर सिंग रिंदा आपल्या परिवारासह नांदेडला स्थायिक झाला. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वयाच्या 18 व्या वर्षी हरविंदरने घरगुती वादातून एका नातेवाईकाची हत्या केली होती.

नांदेडमध्ये हरविंदरने खंडणी वसूल करण्याची काम सुरु करत तिकडे किमान दोन हत्या केल्या. एकेकाळी विद्यार्थी नेता म्हणून ओळख असलेला हरविंदर सिंग रिंदा हा चंदीगढ पोलिसांना हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी आणि शस्त्र बाळगल्याप्रकरणी हवा होता. 2016 ते 2018 या काळात रिंदाविरुद्ध अनेक गुन्हे दाखल झाले आहेत.

तपासयंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, बनावट पासपोर्टच्या आधारे हरविंदर नेपाळमार्गे पाकिस्तानात दाखल झाला. 35 वर्षीय हरविंदरला पाकिस्तानात ISI या गुप्तचर यंत्रणेने आपला पाठींबाही दिल्याचं कळतंय. पंजाबमध्ये खलिस्तानी चळवळ पुन्हा जिवंत करण्याचं काम हरविंदरकडे देण्यात आलं आहे.