‘... म्हणून गिरीश महाजनांना मोठं केलं’, एकनाथ खडसेंचा फडणवीसांवर हल्लाबोल 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

‘... म्हणून गिरीश महाजनांना मोठं केलं’, एकनाथ खडसेंचा फडणवीसांवर हल्लाबोल 
मुंबई -
'चाळीस वर्षे मी भाजप रुजवण्याचा प्रयत्न केला. मात्र 40 वर्षे माझी अवहेलनाच केली. पुढच्या कालखंडात नगरपालिका आणि जिल्हा परिषद आमच्या ताब्यात येईल. इतक्या वर्षात गिरीश महाजन हे त्यांच्या मतदारसंघात जाऊ शकले नाहीत. नेते होऊ शकले नाहीत. इतकी वर्षे संघर्ष, आंदोलन, भाषणं मी करत होतो. नाथाभाऊंना कुणीतरी स्पर्धक म्हणून गिरीश महाजनांना मोठं केलं जातंय. पक्षात नाथाभाऊ मोठे होत आहेत. मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होत आहेत, म्हणून काही नेत्यांनी महाजनांना मोठं केलं’, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. 
जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय पाहायला मिळाला. 21 जागांपैकी 11 जागा राष्ट्रवादी काँग्रेस, 7 जागांवर शिवसेना, 2 जागांवर काँग्रेस आणि एका जागेवर भाजप उमेदवार विजयी झालाय. तर एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचाही एकतर्फी विजय झाला आहे. या पार्श्वभूमीवर खडसे यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी फडणवीस आणि महाजन यांच्यावर सडकून टीका केली. 

गेल्या 6 वर्षांपूर्वी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 'क' वर्गात होती. आती ती 'अ' वर्गात आली आहे. बँकेचा संचित तोटा आम्ही कमी केला. शेतकऱ्यांना अधिक लाभ देण्याचा प्रयत्न केला. त्याचे फलित या निवडणुकीचा निकाल आहे. गिरीश महाजन यांना निवडणूक लढवण्याची हिंमत नव्हती म्हणून त्यांनी पळ काढला. अपयश येणार याची जाणीव त्यांना झाली होती. या निवडणुकीने जळगाव जिल्ह्यात नाथाभाऊची ताकद किती आहे हे दाखवून दिल्याचं खडसे यांनी आवर्जुन सांगितलं.

उल्लेखनीय आहे, जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ऍड. रोहिणी खडसे यांचा विजय झाला आहे. ओबीसी महिला राखीव मतदारसंघातून रोहिणी खडसे यांनी एकतर्फी विजय मिळवला आहे. हा विजय म्हणजे गेल्या 6 वर्षांत केलेल्या कामाची पावती असल्याची प्रतिक्रिया रोहिणी खडसेंनी व्यक्त केली आहे. यापुढंही जिल्हा बँक आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.