राष्ट्रवादी एनडीएच्या बैठकीत सहभागी होणार, अजित पवार स्वत: दिल्लीला जाणार

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

राष्ट्रवादी एनडीएच्या बैठकीत सहभागी होणार, अजित पवार स्वत: दिल्लीला जाणार

   नाशिक  ,  (प्रबोधन न्यूज )   -    कायम काँग्रेस आणि संयुक्त पुरोगामी आघाडीसोबत राहिलेल्या राष्ट्रवादीने आता वेगळा मार्ग पत्करला आहे. राष्ट्रवादीत  फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचा एक गट भाजपसोबत गेला आहे. या गटाने भाजपशी हातमिळवणी करून राज्यातील सत्तेतही सहभाग घेतला आहे. आता हाच गट भाजपच्या नेतृत्वातील एनडीएतही सामील होणार आहे. एनडीएची पुढच्या आठवड्यात दिल्लीत बैठक होणार असून राष्ट्रवादीचा हा गट एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

येत्या 18 जुलै रोजी एनडीएची बैठक होत आहे. या बैठकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला जाणार आहेत. त्यांच्यासोबत भाजप नेते प्रफुल्ल पटेलही असणार आहेत. स्वत: अजित पवार यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून राज्यातील समस्या त्यांना सांगणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. अजित पवार हे नाशिक दौऱ्यावर आहेत. पहिल्यांदाच अजित पवार नाशिकला आले आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली.

मोदींचं नेतृत्व करिश्मा असलेलं

केंद्रात नरेंद्र मोदी यांचा करिश्मा असलेलं नेतृत्व आहे. मी सकाळी येत असताना, अनेक लोकं मला भेटली. वंदे भारत ही ट्रेन चांगली असल्याचे प्रवाशांनी सांगितलं, असं अजित पवार म्हणाले. उद्या जर विरोधकांनी चहा पानावर बहिष्कार नाही टाकला, तर आम्ही सहकार्य करू. जो काम करतो, त्याच्याच तक्रारी असतात. काही तक्रारी असतील, तर आम्ही सोडवू. एखादं काम चांगलं असेल, तर मी त्याच्यावर टीका करत नाही. ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमावर मी कधीच टीका केली नाही. नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी मी स्वतः लक्ष घालणार आहे, असंही ते म्हणाले.

तो अधिकार विधानसभा अध्यक्षांचा

विरोधी पक्षाच्या नेत्याची निवडीबाबतही त्यांनी भाष्य केलं. विरोधी पक्षनेत्याच्या निवडीबाबत विधानससभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर बघतील ना. विरोधकांकडून पत्र तरी आलं पाहिजे. ती निवड अधिवेशनाच्या काळात करतात. 17 तारखेला अधिवेशन सुरू होणार आहे. तीन आठवडे सुरू राहणार आहे. विरोधी पक्षनेता निवडण्याचा संपूर्ण अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

प्रत्युत्तर देणार

शरद पवार यांची सभा झाली आहे. त्यानंतर खाते वाटप होतं. आता अधिवेशन आहे. ते झाल्यावर आम्ही सभा घेऊ. तुम्ही काळजी करू नका. आम्ही योग्य निर्णय घेऊ. उद्या चहापानाचा कार्यक्रम आहे. उद्या मंत्र्यांची 10 वाजता मिटिंग आहे. आदिती तटकरे, संजय बनसोडे हे नवीन आहेत. आम्ही बाकीचे सहाजण अनुभवी आहोत. प्रश्नाची उत्तरे देणं अवघड आहे असं नाही, असंही त्यांनी सांगितलं.

तर विचार करू

यावेळी त्यांनी समान नागरी कायद्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. समान नागरी कायद्याचा ड्राफ्ट पाहिल्यावर आम्ही आमची भूमिका मांडू. कुठल्याही घटकावर अन्याय होणार नाही, अशी आमची भूमिका आहे. 370 कलम काढलं, चांगली गोष्ट झाली. समान नागरी कायद्याचा ड्राफ्ट जर संपूर्ण देशाच्या भल्याचा असेल, तर विचार करू, असं त्यांनी सांगितलं.