पीएसआय पदाची शारीरिक चाचणी आणि मुलाखत लांबणीवर ; उमेदवारांमध्ये संभ्रम 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पीएसआय पदाची शारीरिक चाचणी आणि मुलाखत लांबणीवर ; उमेदवारांमध्ये संभ्रम 
पुणे - 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पीएसआय पदासाठी दि. 19 नोव्हेंबर ते 9 डिसेंबरदरम्यान पुणे आणि कोल्हापूर या ठिकाणी होणारी शारीरिक चाचणी आणि मुलाखत प्रक्रिया प्रशासकीय कारणामुळं लांबणीवर टाकण्यात आली आहे. आयोगानं या संदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. तर, शारीरिक चाचणी आणि मुलाखतीचा कार्यक्रम लांबणीवर पडल्यानं उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आयोगानं पुणे, नाशिक आणि कोल्हापर या तीन केंद्रांवर ही प्रक्रिया आयोजित केली होती. 2019 साली पीएसआय पदाची मुख्य परीक्षा झाली होती. तेव्हापासून उमेदवार मुलाखत आणि शारीरिक चाचणीच्या प्रतीक्षेत आहेत.

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पोलीस उपनिरीक्षक परीक्षा 2019 च्या शारीरिक चाचणी आणि मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या आहेत. प्रशासकीय कारणास्तव शारीरिक चाचणी आणि मुलाखती पुढे ढकलल्याचं आयोगानं स्पष्टीकरण दिलं आहे. दोन दिवसापूर्वी कोल्हापूर केंद्राच्या पुढे ढकलण्यात आल्यात. तर, काल पुणे केंद्रावरील चाचण्या पुढे ढकलल्याचं आयोगानं स्पष्ट केलं. शारीरिक चाचणी आणि मुलाखत पुढे ढकलल्यानं उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019-पोलीस उपनिरीक्षक पदांच्या 496 जागांसाठी ही प्रक्रिया सुरु आहे. पुणे आणि कोल्हापूर केंद्रावरील पोलीस उपनिरीक्षक शारीरिक चाचणी आणि मुलाखतीसाठी नव्यानं तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. 2019 साली पीएसआय पदाची मुख्य परीक्षा झाली होती. त्यानंतर आतापर्यंत म्हणजेच तब्बल दोन वर्षांपासून ही भरती प्रक्रिया रखडली होती. कोरोना, आरक्षणाचा मुद्दा तसेच एमपीएससीकडील इतर कारणांमुळं ही भरती प्रक्रिया लांबत चालली आहे.