खासदार भावना गवळी यांना ईडीकडून तिसरे समन्स 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

खासदार भावना गवळी यांना ईडीकडून तिसरे समन्स 
मुंबई - 
शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून तिसरे समन्स बजावण्यात आले आहे. भावना गवळी यांना 24 नोव्हेंबरला ईडी कार्यालयात हजर राहण्यास या समन्सद्वारे सांगण्यात आले आहे. एएनआयनं या संदर्भात ट्विट केलं आहे. 

भावना गवळी यांना ईडीनं यापूर्वी दोन समन्स पाठवली होती. दुसऱ्या समन्सनुसार 4 ऑक्टोबरला भावना गवळींना 4 ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, तब्येतीचं कारण देत भावना गवळी या चौकशीला हजर राहिल्या नव्हत्या. त्यावेळी त्यांनी ईडी चौकशीला हजर राहण्यासाठी वेळ मागितला होता. ईडीच्या तिसऱ्या समन्सनंतर भावना गवळी चौकशीला हजर राहणार का हे पाहावं लागणार आहे.

भावना गवळी यांच्या ट्रस्टमध्ये 17 कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून तपास करण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्ते हरिष सारडा यांनी भावना गवळी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. नॅशनल को ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट को-ऑपरेशन कडून बालाजी सहकारी पार्टिकल बोर्डनं 43.35 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. हरिष सारडा यांनी भावना गवळी यांनी एनसीडीसीकडून कर्ज घेतलं होतं मात्र, ती कंपनी कधीच सुरु केली नव्हती असा दावा केला. 'भावना अ‌ॅग्रो प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस' कंपनीमध्ये अनियमितता केल्याचा देखील आरोप करण्यात आला होता. या कंपनीसाठी दोन वेगवेगळ्या बँकांकडून 7.5 कोटींचं कर्ज घेण्यात आलं होतं. नंतर ही कंपनी भावना गवळी यांच्या खासगी सचिवाला 7.9 कोटी रुपयांना विकल्याचा आरोप करण्यात आला होता.