“फेस्टिव्हल ऑफ स्टार्टअप” मुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांचे प्रतिपादन
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
ऑटो क्लस्टर सभागृह येथे दोन दिवसीय “फेस्टिव्हल ऑफ स्टार्टअप २०२३” या कार्यक्रमाचे उदघाटन
पिंपरी, (प्रबोधन न्यूज ) - देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी नव स्टार्टअपला चालना देणे आवश्यक आहे. शहर पातळीवर स्टार्टअप इकोसिस्टिम खरोखर समर्थन दिल्यास उत्पादन, रोजगार निर्माण होवून अर्थव्यवस्थेला हातभार लागेल. हा हेतू साध्य करण्यासाठी शहरस्तरावर “फेस्टिव्हल ऑफ स्टार्टअप” आयोजन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिका तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.
स्टार्टअप्सला गुंतवणूकदार, तज्ञ मार्गदर्शक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन मिळण्याच्या दृष्टीने चिंचवड येथील पिंपरी चिंचवड इनक्युबेशन सेंटर, ऑटो क्लस्टर सभागृह येथे दोन दिवसीय “फेस्टिव्हल ऑफ स्टार्टअप २०२३” या कार्यक्रमाचे उदघाटन महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याहस्ते झाले. त्यावेळी सहभागी स्टार्टअपला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी, नॅशनल अर्बल डिजिटल मिशन प्रकल्प प्रमुख मनप्रीत सिंह, नेटसर्फचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुजित जैन, श्री बालाजी विद्यापीठाचे कुलपती परमानंदन बालसुब्रमण्यम, सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, सहशहर अभियंता मनोज सेठीया, ऑटो क्लस्टरचे व्यवस्थापकीय संचालक किरण वैद्य, उपायुक्त रविकिरण घोडके, कंपनी सेक्रेटरी चित्रा पंवार आदी मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी, मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. प्रसंगी, प्रमुख पाहुण्यांचा प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला.
शेखर सिंह पुढे म्हणाले की, पुणे ही सर्वात गतिमान बाजारपेठ आहे. भारतातील दिल्ली, मुंबई, बंगळूरू आणि गुडगाव या शहरानंतर स्टार्टअपच्या बाबतीत पुणे आघाडीच्या शहरांपैकी एक आहे. येथील स्टार्टअप्स फक्त स्टार्टर्स किंवा स्टार्टअप एवढ्यापुरते मर्यादित नाहीत. तर, येथे इंजिनीअरिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग तसेच ईव्ही क्षेत्रात सक्रियपणे काम करणारे स्टार्टअप देखील आहेत. पुण्याच्या आसपास जवळपास 600 स्टार्टअप्स सर्व गोष्टीपासून सर्व गोष्टी पर्यंतच्या श्रेणीत गुंतलेले आहेत. दुचाकीपासून ते चारचाकी वाहनांपर्यंत, पॉवर ट्रेनपासून ते बॅटरी, इतर तंत्रज्ञानापर्यंत, सॉफ्टवेअरसह पुणे, पिंपरी चिंचवड आघाडीवर आहे. पिंपरी चिंचवडमध्ये स्मार्ट सिटी मिशनने खरोखरच संपूर्ण स्टार्टअप, इन्क्युबेशन इकोसिस्टम उभारण्यावर भर दिला असून इकोसिस्टमला गती देण्यासाठी २०१९ पासून ५० स्टार्टअप या ठिकाणी कार्यरत असून गुंतवणुकदारांनी पुढाकार घेवून याकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवून बघावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.
नॅशनल अर्बल डिजिटल मिशन प्रकल्प प्रमुख मनप्रीत सिंह म्हणाले की, स्टार्टअप संकल्पना रुजविण्यात भारताला यश मिळाले आहे. कोणत्याही राज्याच्या उभारणीसाठी विद्यार्थी, सरकारी आणि खासगी क्षेत्र हे तीन स्तंभ महत्वाची भूमिका बजावतात. पाण्याची गुणवत्ता, डिजिटल इकोसिस्टम, शहरी डिजिटलायझेन, पार्किंग स्टार्टअप, ड्रोन स्टार्टअप, मालमत्ता कर सेवा, जीआयएस मॅपिंग यासह अनेक आव्हानांना तोंड देण्यासाठी अनेक स्टार्टअपची शहरीकरणासाठी आवश्यकता आहे. यासाठी तरुणांनी पुढे यावे, यातील एक संधी निवडून आव्हान पेलावे. निधी उभारण्यासाठी भारत सरकार आपल्यासोबत असल्याचे त्यांनी सांगितले.
नेटसर्फ प्रा.लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुजित जैन म्हणाले की, आयुष्यातील सर्वोत्कृष्ट कल्पना लोकांकडून येतात. यामुळे “फेस्टिव्हल ऑफ स्टार्टअप” च्या माध्यमातून स्टार्टअप विश्वासोबत जुळण्याची संधी मिळाली आहे. स्टार्टअप हा खडतर आणि लांबचा प्रवास आहे, पार केल्यास जग जिंकण्याची ताकद तुमच्यात येते. त्यासाठी समर्पण आवश्यक आहे. स्टार्टअप्सबद्दलच्या सर्व चांगल्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. त्या शोधल्यास यश मिळते, त्यामागे खूप मोठा आणि आनंदी पूर्ण सिद्धांत आहे. प्रत्येक स्टार्टअप संस्थापकाला सकारात्मक होण्यासाठी सकारात्मक स्विच करणे खूप महत्वाचे आहे. दृढनिश्चय केल्यास मन कधीही हार मानायला तयार नसते. फेस्टीवल ऑफ स्टार्टअपमधून अनेक विद्यार्थी प्रेरणा घेतील आणि स्टार्टअप इकोसिस्टमची अर्थव्यवस्था तयार करण्यास पुढाकार घेतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
श्री बालाजी विद्यापीठाचे कुलपती परमानंद बालसुब्रमण्यम म्हणाले की, आजचा तरुण परिवार आणि नोकरीत गुंतला आहे. आयुष्यात नवीन ध्येय बाळगण्याकडे त्याचा कल दिसून येत नाही. शिक्षण आणि नोकरीचा शोध यातच जिवन जगण्यात सध्या धन्यता मानली जात आहे. नव्या शोधाकडे तरुणांचे लक्ष नाही. त्यामुळे रोजगार निर्मीतीचा दुष्काळ वाढतच चालला आहे. याच्या उलट बाजूने तरुणांनी बघायला हवे. एखाद्या समस्येचा उपाय शोधून स्टार्टअप सारखी संकल्पना उभारणे गरजेचे आहे. स्टार्टअप फेस्टीव्हल सारख्या कार्यक्रमांमधून तरुणांनी संधी शोधणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, विविध स्टार्टअप स्टॉलला मान्यवरांनी भेटी देवून स्टार्टअप उपक्रमाबददल माहिती जाणून घेतली. तसेच, ड्रोन फवारणी आणि डीवाय पाटील इंस्टीटयूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रेसिंग कारचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
पहिल्या दिवसाच्या दुस-या सत्रात अमोल नितावे ("इव्हॉल्व्हिंग एक्स प्रोग्राम द्वारे उद्योजकता वृत्तीला प्रोत्साहन द्या"), दिपक विश्वकर्मा ("उद्योजकांसाठी विक्री आणि विपणन थेट कार्यशाळा"), कपिल बैरागी- सहाय्यक महाव्यवस्थापक (HOABL) सीए (“स्टार्टअप इव्हॅल्युएशन, एमव्हीपी विश्लेषण आणि व्यवसायातील फंड क्रायसिस मॅनेजमेंट), "शहराच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण पायाभूत सुविधांची आवश्यकता"या विषयावर पॅनल चर्चा तसेच भरत ओसवाल ("तुमचा मार्ग आजमावत आहे - स्टार्टअप वाढीसाठी टिपा आणि युक्त्या"), मीरा मणेरीकर (“स्टार्टअप ह्युमन रिसोर्स स्ट्रॅटेजी”) तसेच "चॅलेंजिंग टाइम्समध्ये नवीनता स्वीकारणे" याविषयावर पॅनेल चर्चा आणि रवी कुमार-(udchalo.com), नवनाथ येवले (येवले चाय)-तळागाळातील कथा त्याचबरोबर पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडला. तसेच दि. ७ रोजी महेश कुलकर्णी माजी सीएफओ, एंजल इन्व्हेस्टर, स्टार्टअप मेंटॉर), मनोज मिश्रा (संचालक - फिनान्झा होल्डिंग पीटीई लिमिटेड, सिंगापूर) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. स्टार्टअप महोत्सवासाठी स्टार इंजिनियर्स, बँक ऑफ बडोदा, श्री बालाजी विद्यापीठ पुणे, शिर्के कन्स्ट्रक्शन्स, एल & टी आणि ब्रदर्स इन्स्टिट्यूट यांनी इनक्युबेशन पार्टनर म्हणून प्रायोजित केला आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, नितेश कामदार यांनी केले. आभार ऑटो क्लस्टरचे व्यवस्थापकीय संचालक किरण वैद्य यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन पिंपरी चिंचवड महापालिका, स्मार्ट सिटी, ऑटो क्लस्टर, इन्क्युबेशन सेंटर व स्मार्ट सारथी टीम यांच्यावतीने करण्यात आले.
"नवीन व्यवसायांमधील अंतर भरून काढण्यासाठी नव उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करण्यावर आमचा भर आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सर्वात अनुकूल स्टार्टअप इको-हब तयार करून त्यांना योग्य मार्गदर्शक आणि गुंतवणूकदारांसोबत संरेखित करण्याबाबतचे उद्दिष्टये ठेवण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी, ऑटो क्लस्टर व इन्क्युबेशनच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडच्या आगामी उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी स्टार्टअप योजना राबविली जात आहे."
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक पिंपरी चिंचवड महापालिका.