A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - मजूर,कामगार यांच्या पाल्यांसाठी पुन्हा मोफत बस सेवा सुरु करा अशी मागणी रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे प्रदेश महासचिव संतोष शिंदे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त 1 प्रदीप जांभळे पाटील व शिक्षण अधिकारी संजय नाईकडे यांच्याकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , पिंपरी चिंचवड शहर हे कामगार व उद्योग नगरी म्हणून ओळखले जाते. राज्यभरातील विविध कानाकोपऱ्यातून मजूर कामगार कामासाठी पिंपरी चिंचवड शहरात येतात.या शहरातील विविध भागातील बांधकाम,मजूर यांच्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांना अडीच ते ३ किलोमीटर अंतरावर महापालिकेच्या शाळेत जावे लागते. विद्यार्थ्यांची पायपीट लक्षात घेता पिंपरी चिंचवड महापालिकेने विद्यार्थ्यांसाठी मोफत बस सेवा सुरू केली होती परंतु हि बस सेवा कोरोना काळात बंद करण्यात आली. कोरोनाकाळात हि बस सेवा बंद झाली असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे मागील शैक्षणिक वर्ष वाया गेले.
अगोदरच मजुरी काम करणाऱ्या पालकांची आपल्या मुलांना शिक्षण देण्याची इच्छा नसते परंतु अनेक सामाजिक संस्थांच्या वतीने त्यांचे समुपदेशन करून त्यांची मानसिकता तयार केली जाते. मात्र महापालिकेकडून दिली जाणारी बससेवा बंद असल्याने पालक आपल्या मुलांना चालत शाळेत पाठवण्यासाठी तयार होणार नाहीत. तसेच लहान मुलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असल्याने पालक एकट्या विद्यार्थ्याला इतक्या लांब शाळेत पाठवत नाहीत. यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू शकतात.
यामुळे हि मोफत बस सेवा परत सुरु झाली तर रावेत,पुनावळे,किवळे,मोशी,चिखली व शहरातील अन्य भागातील सर्व विद्यार्थ्यांना शाळेत जाता येईल.तरी आपण विद्यार्थ्यांचा शैक्षणिक हिताचा विचार करून लवकरात ज्या ज्या भागात मोफत बसेस ची गरज आहे अश्या ठिकाणी आपण बस सेवा शाळा सुरु झाल्यानंतर चालू करण्यात यावी, असे हि निवेदनात म्हटले आहे.