राज ठाकरे यांना अटक होणार ? मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा व धरपकड सुरू

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

राज ठाकरे यांना अटक होणार ? मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा व धरपकड सुरू

मुंबई, दि. ३ मे – मुंबईतून मनसे नेते महेंद्र भानुशाली यांना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. त्यांच्या ऑफिसमधून भोंगा ताब्यात घेतला आहे. भोंग्यावर हनुमान चालिसा लावल्या प्रकरणी त्यांना ताब्यात घेतले आहे. राज्यात सर्वात अगोदर त्यांनी हनुमान चालिसा लावला. उद्या बुधवार दि. ४ मे पासून जर मशिदीवरील भोंगे उतरले नाही तर मनसे सैनिक मोठ्या आवाजात भोंग्यावर हनुमान चालिसा लावणार असल्याचे राज ठाकरे यांनी १ मेच्या औरंगाबाद येथील सभेत जाहीर केले होते. त्यामुळे आज (मंगळवार, दि. ३) पासूनच गृह खाते सक्रीय झाले असून संपूर्ण राज्यात मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा देण्यास सुरुवात केली आहे. तर काही ठिकाणी धरपकड झाल्याचे समजतंय.

राज ठाकरे यांच्या घराबाहेर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. राज ठाकरे यांच्या घरी पोलीस नोटीस घेऊन पोहोचणार असल्याचं समजतंय. राज ठाकरे यांच्या बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढत चालली आहे. मनसेचे नेते जामदार यांनी जर राज ठाकरे यांना अटक झाली तर मनसे सैनिक गप्प बसणार नाही. त्याचे परिणाम राज्य सरकारला भोगावे लागतील असा इशारा दिला आहे. भोंग्याचा विषय हा मनसे पुरता मर्यादित राहिला नसून संपूर्ण हिंदू समाजाचा झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राज्यभर पोलीस एक्शन मोडवर असून, सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांच्या सुट्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. ३० हजार होमगार्ड्स तयार ठेवण्यात आले आहेत, तर राज्य राखीव पोलीस दलाच्या ७ तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरील कारवाईचा निर्णय वर्षा बंगल्यावर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित झाला असल्याचे सूत्रांकडून समजतंय. या बैठकीस मुख्यमंत्री, संजय राऊत व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून, कशा प्रकारे मनसे नेत्यांना हनुमान चालिसा लावण्यापासून रोखण्यात येईल याचा उहापोहा करण्यात आला आहे.

आतापर्यंत १५ हजार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मनसेचे अनेक कार्यकर्ते नॉट रिचेबल झाले असून, पुण्यातील मनसेचे नेते व नगरसेवक वसंत मोरे हे आपल्या कार्यकर्त्यांसह तिरूपती बालाजीला गेल्याचे सांगण्यात येतंय.

दरम्यान, या कारवाईचे समर्थन महा विकास आघाडीच्या नेत्यांकडून केलं जातंय. गुन्ह्याचे उल्लंघन झाले तर पोलीस कारवाई करणारच असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं आहे. राज्यात पर राज्यातील व्यक्ती घुसल्या असून, त्यांचा राज्यातील शांतता भंग करण्याचा डाव आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

पुण्यातही या नोटिसीचे पडसाद उमटले असून, खालकर चौकात मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र जमले आहेत. मनसे पदाधिकारी अजय शिंदे यांनी नोटिसा येतील, अटकही होईल पण आम्ही घाबरणार नसल्याचं सांगितलंय. पोलिसांवर मविआच्या नेत्यांचा दबाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याच चौकात राज ठाकरे यांनी आरती व हनुमान चालिसाचा कार्यक्रम घेतला होता. उद्या महा आरती होणारच व  मनसे सैनिकच नव्हे तर सर्व हिंदू रस्त्यावर उतरलेले दिसतील असा दावा शिंदे यांनी केला आहे. गुन्हा आमच्यासाठी मेडल आहे अशी भूमिका औरंगाबादच्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांच्याशी स्वतः राज ठाकरे व अमित ठाकरे फोनवरून संपर्क साधत आहेत. पक्ष त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली असल्याचे या कार्यकर्त्यांनी सांगितले. हे अपेक्षितच होते. घाबरू नका, पक्षाचे लिगल सेल तुमच्या मदतीसाठी तयार आहे. असंही त्यांनी सांगितलं असल्याचं समजतंय.