बेंगळुरूला जाणाऱ्या एअर एशियाच्या विमानाला 10 तासांपेक्षा जास्त उशीर, पुणे विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ

बेंगळुरूला जाणाऱ्या एअर एशियाच्या विमानाला 10 तासांपेक्षा जास्त उशीर, पुणे विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ

पुणे , (प्रबोधन न्यूज )  - बेंगळुरूला जाणाऱ्या एअर एशियाच्या विमानाला 10 तासांपेक्षा जास्त उशीर त्यामुळे प्रवासी चांगलेच संतापले.पुणे विमानतळावर पुणे ते बेंगळुरूला जाणारं एयर आशियाचं पहाटे पाच वाजताचं विमान आज दुपारपर्यंत विमान तळावर आलं नसल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

या विमानासाठी नागरिक पहाटे 3 वाजेपासून विमानतळावर दाखल झाले होते.मात्र दुपारपर्यंत कोणतीही पुर्वसूचना न देता विमान विमानतळावर आलं नाही.त्यामुळे विमानतळावर प्रवाशांनी गोंधळ घातला आहे.जोपर्यंत आमचं विमान येत नाही तोपर्यंत कोणतंही विमान जाऊ देणार नसल्याची भूमिका प्रवाशांनी घेतली आहे.विमान न आल्याने अनेकांची महत्वाची कामं खोळंबली..पुणे ते बेंगळुरूला जाण्यासाठी नियोजित एआयएक्स कनेक्ट फ्लाइटला तांत्रिक समस्येमुळे उशीर झाला आहे. मात्र प्रवाशांची योग्य काळजी आणि त्यांना योग्य सुविधा देणार असल्याचं एअर एशिय़ा इंडियाकडून सांगण्यात आलं आहे.संपूर्ण प्रक्रियेमध्ये प्रवाशांची सुरक्षा जास्त महत्वाची असल्याचंदेखील त्यांनी म्हटलं आहे.