परमबीर सिंग म्हणाले - मोकळा श्वास घेऊ द्या, मग खड्ड्यातूनही बाहेर येईन ! सुप्रीम कोर्टाने फेटाळली संरक्षण देण्याची याचिका
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मला मोकळा श्वास घेण्याची परवानगी मिळाली तर मी खड्ड्यातून बाहेर येईल, अशी प्रतिक्रिया मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने परमबीर यांना संरक्षण देणारी याचिका फेटाळून लावली आहे. तुम्ही कुठे आहात हे जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत संरक्षण मिळणार नाही, असं कोर्टाने त्यांना स्पष्ट बजावलं. या प्रकरणावर 22 नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
परमबीर सिंग यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेतून सिंग यांनी संरक्षणाची मागणी केली आहे. मात्र, कोर्टाने हे संरक्षण देण्यास नकार दिला आहे. सिंग कुठे आहेत हे जोपर्यंत सांगितलं जात नाही तोपर्यंत त्यांना संरक्षण दिलं जाणार नाही. ते देशात आहेत? देशाच्या बाहेर आहेत? की आणखी कुठे आहेत? असा सवाल कोर्टाने केला. जस्टिस संजय किशन कौल यांनी हा सवाल केला. तुम्ही कोणत्याच चौकशीत सामिल झाला नाहीत. तरीही तुम्हाला संरक्षणाचा आदेश हवा आहे. आमची शंका चुकीची असू शकते, पण तुम्ही जर परदेशात असाल आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहत असाल तर आम्ही तुम्हाला संरक्षण कसे देऊ शकतो? असा सवाल कोर्टाने केला. तसेच तुम्ही कुठे आहात हे 22 नोव्हेंबर रोजी सांगा, असंही कोर्टाने म्हटलं आहे.
खोट्या एफआयआरच्या माध्यमातून माझी प्रचंड छळवणूक केली असा आरोप करत पोलिस अधिकाऱ्यानेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत सिंग यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे. या प्रकरणात सिंग यांना अटकेसारख्या कठोर कारवाईपासून असलेला दिलासा 21 ऑक्टोबरपर्यंत कायम ठेवण्यात आला होता. परमबीर सिंग, पाच पोलीस आणि इतर दोघांविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात एक एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 22 जुलै रोजी एका बिल्डरने हा एफआयआर दाखल केला आहे. त्यात सिंग यांच्यावर 15 कोटी रुपये मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा गुन्हे अन्वेषण विभाग चौकशी करत आहे. त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंटही जारी करण्यात आलं आहे. मात्र, अद्याप पर्यंत सिंग हे पोलिसांसमोर हजर झालेले नाहीत.