हिटलरसारखे मोदींना मरण येणार - काँग्रेस नेते सुबोधकांत सहाय
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
नवी दिल्ली, (प्रबोधन न्यूज) – काँग्रेस नेते शेख हुसेन यांनी नागपूर येथे मोदींना कुत्र्यासारखे मरण येईल असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. नंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आता काँग्रेस नेते सुबोधकांत सहाय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अपशब्द वापरले आहेत. जंतर मंतर येथे काँग्रेसच्या आंदोलनात बोलताना त्यांनी मोदींना हिटलरसारखे मरण येईल असे निंदजनक वक्तव्य केले आहे. विशेष म्हणजे सुबोधकांत सहाय हे माजी केंद्रीय मंत्री आहेत. ते झारखंडचे नेते आहेत.
अग्निपथ योजना आणि राहुल गांधींच्या ईडीच्या चौकशीवरून संतप्त झालेले काँग्रेस नेते सुबोधकांत सहाय यांनी जंतर-मंतरवरील 'सत्याग्रहा'च्या मंचावरून पंतप्रधान मोदींवर वादग्रस्त टिप्पणी केली आहे. झारखंडमधून आलेल्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने त्यांची हिटलरशी तुलना करून मर्यादा ओलांडली. ते म्हणाले की पंतप्रधान मोदी हिटलरच्या मार्गावर चालले आहेत आणि हिटलर सारखा त्यांचा मृत्यू होईल. सुबोधकांत यांनी ही टीका केली तेव्हा काँग्रेसचे अनेक बडे नेते मंचावर उपस्थित होते आणि त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर टाळ्यांचा कडकडाटही झाला.
अग्निपथ योजनेबद्दल माजी केंद्रीय मंत्री सुबोधकांत म्हणाले की, "मला वाटते की मोदी याने हिटलरचा सर्व इतिहास ओलांडला आहे. हिटलरनेही खाकी नावाची अशी संघटना लष्करात तयार केली होती. मोदींनी हिटलरचा मार्ग अवलंबला तर हिटलरसारखा मरेल. मोदींनी याची आठवण ठेवावी असा सल्लाही दिला.
गेले 10 दिवस आपण संघर्षाचे पर्व साजरा करीत आहोत, हा उत्साह, समर्पण पाहायला मिळत आहे. कोणाच्याही चेहऱ्यावर क्लेष दिसत नाहीत. कारण मोदींना 135 वर्षांचा इतिहास माहीत नाही, पण आपण कोणती परंपरा पाळतो हे काँग्रेसच्या लोकांना माहीत आहे. मला अभिमानाने सांगायचे आहे की, लष्कराची काही कौटुंबिक बाब होती आणि आम्ही राहुलजींना पाहिले की त्यांना दिल्लीच्या पाच पोलिस ठाण्यात अटक केली होती. मला वाटले की या माणसाकडे शक्ती आहे. डोळ्यात डोळे घालून बोलणारा कोणी असेल तर तो राहुल गांधी. आणि मोदींना वाटते आपण या माणसाला घाबरवू शकू.
सुबोधकांत सहाय म्हणाले की, झारखंडमध्ये आमचे युतीचे सरकार आहे, ते पाडण्यासाठी ईडीचे दीड महिन्यांपासून दररोज छापे पडत आहेत. निरनिराळ्या डावपेचाने मुख्यमंत्र्यांना कसे अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय. भाजपने आपली २-३ निवडून आलेली सरकारे कशी पाडली हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. मदारीच्या रूपाने या देशात आलेले मोदी पूर्णत: हुकूमशाहीत आले आहेत.' काँग्रेस हा हुतात्म्यांचा पक्ष असल्याचे सांगून माजी मंत्री म्हणाले, 'काँग्रेसने कधीच लक्ष्मणरेषा ओलांडली नाही. नेहरू गांधी कुटुंब, जेव्हा सोनिया गांधी पंतप्रधान होण्यास नकार देत होत्या, तेव्हा मी त्यांचा माईक हिसकावून घेतला होता. तेव्हा मी म्हणालो की, मी तुम्हाला बोलू देणार नाही, कारण तुमच्या नावावर आम्ही तुम्हाला निवडले आहे, तुम्ही त्यांच्याकडे बोटे दाखवत आहात. काँग्रेसचा कोणताही कार्यकर्ता हे सहन करणार नाही.