'महाटीईटी'चे महाघोटाळे : तुकाराम सुपे, अभिषेक सवारीकरला अटक; आणखी आरोपींचा सहभाग- अमिताभ गुप्ता
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
महाटीईटी परीक्षेची जाहिरात 2019 मध्ये देण्यात आली होती. त्यानंतर याची परीक्षा जानेवारी 2020 मध्ये झाली होती. त्या शिक्षक पात्रता परीक्षेत पैसे घेऊन उत्तीर्ण केल्याचा ठपका तुकाराम सुपे यांच्यावर आहे. तुकाराम सुपे याच्या घरातून 88 लाख 49 हजार 980 रोख, पाच ग्राम सोन्याचे नाणे, 5 लाख 50000 हजार रुपयांची एफ डी केल्याची कागदपत्रे जप्त केली आहेत. याशिवाय सुपेने त्याच्या मित्राला लाखो रुपये दिल्याचेही माहिती मिळाली आहे, असं पुणे पोलिसांनी सांगितलं आहे.
म्हाडाच्या परीक्षेसंदर्भात प्रीतीश देशमुख यांच्या घरी केलेल्या छापेमारीत 2020 च्या टीईटी परीक्षेचे सुमारे 40 ते 50 विद्यार्थ्यांचे ओळखपत्र सापडले होते. यामुळं टीईटी परीक्षेसंदर्भात चौकशी सुरु करण्यात आली होती. तुकाराम सुपे याने 1 कोटी 70 लाख, प्रीतिश देशमुख याने1 कोटी 25 लाख तर अभिषेक सावरीकर याने 1 कोटी 25 लाख असे एकूण 4 कोटी 20 लाख रुपये घेतल्याचं चौकशीत कबुल केलं आहे. त्यापैकी 90 लाख रुपये जप्त करण्यात आले. यात आणखी आरोपी आहेत, ही लिंक वाढत जाणार असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणाची मोडस ऑपरेंडीही विलक्षण होती. ज्या विद्यार्थ्यांकडून पैसे घेण्यात आले होते. त्या विद्यार्थ्यांना ओएमआर रिकामं ठेवण्यास सांगण्यात आलं होतं. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांच्या ओएमआरमध्ये बरोबर उत्तर नोंदवून त्या विद्यार्थ्यांचे निकाल बदलले जात होते. प्रितेश देशमुख यांच्या घरी केलेल्या छापेमारीत 2020 च्या टीईटी परीक्षेचे सुमारे 40 ते 50 विद्यार्थ्यांचे ओळखपत्र सापडले होते. धक्कादायक बाब म्हणजे 2021 च्या टीईटी परीक्षेत यातील बरेच विद्यार्थी पात्र असल्याच यादीवरून लक्षात आहे. तपासात हे अपात्र उमेदवार पात्र करण्यासाठी तुकाराम सुपे यांचा सहभाग असल्याचं तपासात उघड झालंय. प्रत्येक विद्यार्थ्यांकडून 50 हजार ते 1 लाख रुपये घेतल्याचं समोर आलं आहे.