कंगना अडचणीत ; महात्मा गांधींवर भाष्य केल्याने काँग्रेसचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई -
एकापाठोपाठ एक वादग्रस्त विधाने करणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत वाढ होत आहे. आता काँग्रेसने महात्मा गांधींवर केलेल्या वक्तव्याविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, अभिनेत्री कंगना रणौतने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली आहे. हे असह्य आहे. महाराष्ट्र काँग्रेस या अभिनेत्रीविरोधात मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
० काय म्हणाली कंगना?
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. ती म्हणाली होती की 'तुम्ही एकतर गांधींचे चाहते असू शकता किंवा तुम्ही नेताजींचे समर्थक होऊ शकता, तुम्ही दोघांचे समर्थक होऊ शकत नाही.' अभिनेत्री पुढे म्हणाली की 'हे लोक फक्त सत्तेचे भुकेले होते. दुसरा गाल फिरवल्याने परमार्थ मिळतो, स्वातंत्र्य नाही. म्हणून आपले नायक हुशारीने निवडा.'
० स्वातंत्र्याबद्दल पहिले विधान
महात्मा गांधींवर वादग्रस्त वक्तव्य करण्यापूर्वी कंगना राणौतने देशाच्या स्वातंत्र्याबाबतही वादग्रस्त वक्तव्य केले होते. ती म्हणाली होती की '1947 मध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळाले नाही तर भीक मिळाली होती. खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले.' अभिनेत्रीच्या या वक्तव्यामुळे तिच्यावर कारवाईची मागणी होत आहे.