नुसतं संभाजीनगर नाही तर छत्रपती संभाजीनगर म्हणा !

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

नुसतं संभाजीनगर नाही तर छत्रपती संभाजीनगर म्हणा !

मुंबई, (प्रबोधन न्यूज) - शिंदे-फडणवीस सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कॅबिनेटमध्ये झालेल्या बैठकीत औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं नामांतर धाराशिव हे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच नवी मुंबई येथील विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव दिलं जाणार आहे. आमच्या कॅबिनेटने हा निर्णय घेतला आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्या सरकारने अल्पमतात असताना शेवटच्या दिवशी कॅबिनेट बैठक बोलवली. त्या बैठकीत औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांची नावं बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसंच नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याचाही निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय अवैध असल्याने तो रद्द करून नव्याने या संदर्भातला निर्णय घेतला गेला आहे. पूर्ण बहुमत असलेलं सरकार याबाबतचा निर्णय घेईल हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

आज नामांतराबाबतच्या फेरप्रस्तावांना रितसर बहुमत असलेल्या सरकारने मान्यता दिली आहे. त्यानुसार औरंगाबाद शहराला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव, उस्माबादला धाराशिव हे नाव तर नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्याचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं.

आम्ही आता यासंदर्भातला प्रस्ताव विधानमंडळात मंजूर करून घेऊ. त्यानंतर केंद्राकडे मान्यतेसाठी पाठवू, त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर ते मंजूर करून घेऊ असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितलं.

दरम्यान, गेल्या कित्येक वर्षांपासून ज्या मुद्द्यावर या शहराचे राजकारण सुरू आहे. तो मुद्दा म्हणजेच ऐतिहासिक औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाता जाता शेवटच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबादच्या नामांतराची घोषणा केली आणि त्यानंतर शहरात एकच धुरळा उडाला. शिवसेना-भाजपकडून जल्लोष, कुठे फटाके, मिठाया वाटण्यात आल्या. तर खासदार इम्तियाझ जलील यांनी मूक मोर्चा काढून विरोधही केला. आता तर नव्या सरकारने पुन्हा एकदा या वादात उडी घेत या निर्णयाला स्थगिती दिली होती.

हेच भाजपवाले औरंगाबादचे संभाजीनगर कधी करता असे विचारत होते. जर फडणवीस आणि शिंदे गटाच्या सरकारने या निर्णयांना स्थगिती दिली असेल तर यांच्यासारखे ढोंगी लोक नाहीत, अशी टीका राऊत यांनी केली होती. उद्धव ठाकरेंनी केंद्राची तसेच कोणाचीही पर्वा न करता हिमतीने एका हिंदुत्ववादी भूमिकेतून लोकभावनेचा आदर करत नामांतराचा निर्णय घेतला होता. हे निर्णय बदलून काय साध्य केले हे फडणवीस यांना विचारायला हवे, मुख्यमंत्री शिंदेंना विचारा म्हणणार नाही. कारण त्यांच्या हातात काहीही नाही. एका बाजूला तुम्ही शिवसेनेने हिंदुत्व सोडले असा आक्रोश करता, तर दुसऱ्या बाजूला हा निर्णय बदलला. आता औरंगजेब तुमचा कसा काय नातेवाईक झालाय? हा उस्मान कोण लागतोय तुमचा? हे सरकार गोंधळलेय, या सरकारवर सर्वोच्च न्यायालयाची टांगती तलवार आहे त्यामुळे त्यांचा मेंदू बधिर झालाय असा घणाघात त्यांनी केला होता.