तानाजी सावंतांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा - नाना पटोले

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

तानाजी सावंतांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा - नाना पटोले

तानाजी सावंत यांनी मागितली जाहीर माफी

मुंबई (प्रबोधन न्यूज) - शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांनी “सत्तांतर होताच विरोधकांना मराठा आरक्षणाची खाज सुटली आहे.” अशी मराठा आरक्षणावरून विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना म्हटले होते. त्यामुळे राजकीय वातावरण तापले असून त्यांना हे वक्तव्य चांगलेच भोवले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध केला. सावंतांच्या विधानावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तानाजी सावंत यांनी खुलासा करावा. तसेच त्यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

“हे विधान मराठा समाजाची बदनामी आणि अपमान करणारे असून त्यावर सरकारने खुलासा केला पाहिजे.” असे नाना पटोले म्हणाले. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यातील विविध संघटना, राजकीय पक्ष यांचे प्रयत्न सुरू आहेत. सरकारी पातळीवर व न्यायालयीन पातळीवरही हा लढा सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. सावंत हे सातत्याने वादग्रस्त विधाने करून वातावरण बिघडवण्याचे काम करत असतात, असा आरोप पटोले यांनी केला आहे.

त्यांचे हे विधान सत्तेचा माज दाखवते; पण महाराष्ट्राची जनता सुज्ञ असून सत्तेची मस्ती कशी उतरवायची हे त्यांना चांगले माहित आहे. सावंत यांनी मराठा समाजाची जाहीर माफी मागावी व शिंदे-फडणवीस यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही नाना पटोले यांनी केली आहे.

सर्व बाजूंनी टीका झाल्यानंतर आणि अनेक संघटनांनी इशा दिल्यानंतर अखेर तानाजी सावंत यांनी जाहीर माफी मागितली आहे. माझ्या वक्तव्यामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी मराठा समाजातील पाळण्यातील बाळापासून ते ९० वर्षांच्या म्हाताऱ्यांपर्यंत प्रत्येकाची माफी मागतो असे सावंत म्हणाले आहेत.

ते म्हणाले की, आमच्या ग्रामीण भागातील चर्चेबाबत चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. बोलण्याच्या ओघात बोलून जातो. त्याचा अर्थ कुठे तरी मराठी समजाच्या भावना दुखवाव्यात. त्यावर कुठे तरी राजकीय ताशेरे मारावेत, या पठडीतला मी मुळीच नाही. हे तुम्ही आतापर्यंत सर्वांनी पाहिले आहे, त्यामुळे माझ्या बोलण्यामुळे किंवा वक्तव्यामुळे माझ्या समाजाच्या जर भावना दुखावल्या गेल्या असतील. तर अगदी पाळण्यातील मुलापासून ते माझ्या आजोबा, पणजोबापर्यंत सर्वांची मी जाहीर माफी मागतो. मी एक या समाजाचा कार्यकर्ता आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, मराठा समाजातील मुला मुलींना त्यांच्या करिअर करीता आरक्षणाची गरज आहे. आमचा समाज मागासलेला आहे,'' असे तानाजी सावंत म्हणाले.

पुढे तानाजी सावंत म्हणाले ''माझं जवळपास एक तासाचं भाषण आहे. मी तासभर बोललो आहे. मराठा क्रांती मोर्चामध्ये काम करणारा माणूस मंत्रिपदावर आहे. हे आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. माझ्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत मराठा आरक्षण मिळाले नाही, तर मी राजीनामा देईल. या भाषेत मी बोललो आहे. पण पहिलं मी माझ्या मराठा समाजा सोबत राहणार आहे, हे विधान प्रसार माध्यमांनी कुठे दाखवले नाही. तसेच माझ्या बोलण्यामुळे मराठा समाजातील बांधव, माता, भगिनींच्या भावना जर दुखावल्या गेल्या असतील, तर मी त्यांची जाहीर माफी मागत आहे. तसेच मी माफी मागवून स्वस्थ बसणार नाही. माझ्या मराठा समाजातील मुला मुलींना आरक्षण मिळावं, यासाठी अविरतपणे कष्ट करीत राहणार आहे'', असे तानाजी सावंत म्हणाले आहेत.