"जपानी शिका उज्ज्वल भविष्य घडवा" - किरियामा सॅन  पिंपरी चिंचवड विद्यापीठात जपानमधील आयटी संधीवर मार्गदर्शन

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

"जपानी शिका उज्ज्वल भविष्य घडवा" - किरियामा सॅन   पिंपरी चिंचवड विद्यापीठात जपानमधील आयटी संधीवर मार्गदर्शन
पिंपरी, (प्रबोधन न्यूज )  -  आजच्या जागतिक स्पर्धेच्या युगात, अनेक भाषांमधील अस्खलितता जीवनाला कलाटणी देणारी ठरू शकते. जपान मध्ये माहिती तंत्रज्ञान, रोबोटिक सायन्स, अभियांत्रिकी यामध्ये जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या अनेक कंपन्या, संस्था आहेत. विद्यार्थ्यांनी जपानी भाषा अवगत केली तर पीसीईटीच्या पिंपरी चिंचवड विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी भविष्यातील या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील, असे मत स्टॉकवेदर जपानचे कार्यकारी अधिकारी किरियामा सॅन यांनी व्यक्त केले.
   पिंपरी चिंचवड विद्यापीठात (पीसीयू) जपान मधील भविष्यातील संधी या विषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित केले होते. यावेळी फिडेल सॉफ्टटेकचे कार्यकारी अधिकारी सुनील कुलकर्णी, एससीसीआयपी जपान विपणन अधिकारी तोशी सुहओ, जपानी भाषा तज्ज्ञ रूपा पासपुले, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आदी उपस्थित होते.
  जपान जगातील तिसरी सर्वात मोठी विश्वासू आणि स्थैर्य असणारी अर्थव्यवस्था आहे. तेथील संस्कृती आत्मसात केली पाहिजे.
तेथे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अफाट संधी आहेत. या संधीचा फायदा घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेतले पाहिजेत असे तोशी सुहओ यांनी सांगितले.
जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवलेल्या अनेक नामवंत आणि मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्या जपान मध्ये आहेत. तेथे तांत्रिक बाबतीत नव संकल्पना आणि संशोधनाला प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळे जगभरातील तज्ज्ञांशी सल्लामसलत करता येते. तंत्र कुशल आणि व्यवस्थापन क्षेत्रातील अनुभवी मनुष्यबळाला जपान मध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे.‌ त्यामुळे अर्थातच रोजगार, स्वयंरोजगार संधी आणि आर्थिक लाभ अधिक मिळतो. याचा विचार करता जपानी भाषा अवगत केली तर त्याचे फायदे अधिक मिळतील. विद्यार्थ्यांनी तांत्रिक कौशल्यांसह अतिरिक्त जीवन कौशल्य विकसित करावी असे कुलकर्णी यांनी सांगितले. रूपा पासपुले यांनी जपानी भाषेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त आणि पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
  स्वागत डॉ. गिरीश देसाई यांनी केले. डॉ. अंजू बाला यांनी आभार मानले. कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते.